एक बी उद्यासाठी.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी केंंद्र - माणी ता. सुुुुरगाणा जिल्हा नाशिक


उपक्रम - एक बी उद्यासाठी

आज दिनांक पाच जून 2022 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक बी उद्यासाठी उपक्रमांतर्गत 

सर्वांना नम्र विनंती, आंबे जांभूळ.,फणस, काजू,बोरे, चिकू, आवळा व इतर कुठलेही फळे ह्या हंगामात आपण खात असतो या फळांच्या बिया कचऱ्यात ना टाकता मधून स्वच्छ करून ठेवा व पावसाळ्यात फिरायला जाताना सोबत घेऊन जा. रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेमध्ये डोंगरावर अशा ठिकाणी पेरून द्या या पेरलेल्या बिया पैकी किमान एक जरी झाड जगले तरी असे  अनेक झाडे तयार होतील. आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपण जर बँकेत पैसे ठेवतो तर फळे मिळण्यासाठी आपण प्रयत्न करु व इतरांनाही हा उपक्रम सांगा. 

आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी  अनेक बियांचा संग्रह केलेला आहे आमच्या शाळेत तर बिज बॅक आहे. 

https://rautmk.blogspot.com/p/blog-page_68.html

आम्ही तर बिया पेरणार आहोत. तुम्ही पण थोडासा प्रयत्न करा. 

तुम्हाला काय करायचं आहे?

सध्या बाजारात अनेक फळे विक्रीसाठी येत आहेत त्या फळांच्या बिया स्वच्छ करून सुकवून एका डब्यात किंवा पिशवीत ठेवायच्या आहेत. पावसाळ्यात फिरायला जाताना या बिया सोबत घेऊन जेथे जेथे उजाड माळरान,डोंगर, मोकळी जागा असेल तेथे बिया पेरून द्यायच्या आहेत. म्हणजे पाऊस पडला की त्या बीया रुजतील व पर्यावरणास मदत होईल. तसेच शक्य झाल्यास चिखलामध्ये  बी टाकून त्याचे गोळे सीड्स बाॅल तयार करा. फिरायला जाताना घेऊन जा व मोकळ्या जागेत ठेवावे. आपले हे छोटीसी कृती निश्चित उद्याची नांदी ठरेल . चला तर आपल्या पासुन सुरुवात करु या. 


 *झाडे लावू, झाडे जगवू पर्यावरणाचे रक्षण करु*.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा