जागतिक चिमणी दिवस 20/03/2022

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. लहानघोडी पो .माणी ता .सुरगाणा जि. नाशिक * 

थोड पाणी झाडाला🌱🌱🌱🌳🌳

थोड दाने पाणी चिमणीला🐥🐥🐥

     आमच्या शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जागतिक चिमणी दिवस दिनांक 20 मार्च 2022 रोजी साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना चिमणी दिवस निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका आरती वाघमारे यांनी माहिती सांगितली  ‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जनजागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावले , चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करुण देणे.

      राऊत सर यांनी*चिमणी वाचवा अभियान*  बद्दल माहित सांगितली.20 मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस जगभर साजरा करण्यात येत आहे. एरव्ही अंगणात, घरात आणि अनेकदा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणाऱ्या चिऊताईचे आता दर्शन होणेही मुश्किल बनले आहे. शहरांतील वाढती सिमेंटची जंगले आणि ग्रामीण भागात होणारी अवैध वृक्षतोड यामुळे चिऊताई दिसेना झाली आहे. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटत चालली असल्याचे दिसत आहे. चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 सध्या उन्हाळा सुरू झाल्याने पक्ष्यांना पाणी  मिळावे यासाठी आपल्या घराजवळ,पक्ष्यांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपलब्ध टाकाऊ साहित्याचा वापर करुन या उन्हाळ्यात  चिमण्यांना पाणी व  धान्य उपलब्ध करुन द्या. 


जिल्हा परिषद प्राथमिक 
शाळा  - लहानघोडी
पो .माणी ता .सुरगाणा
जि. नाशिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा