आज दिनांक 28/2/2022 रोजी जि.प.प्रा.शाळा लहानघोडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले
एकदा विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला, सुप्त गुणांना आणि सर्जनशीलतेला सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळाली. दैनंदिन जीवन विज्ञानाशिवाय जगणे केवळ अशक्यच आहे असा संदेश देणारे आणि विविध प्रसंगात विज्ञानाच्या साथीने जीवननौका कशी पार करता येईल ? या दोन्ही अनन्यसाधारण गोष्टींची उकल सहजसोप्या अन् साध्या प्रयोगातून या प्रसंगी विद्यार्थ्यांनी केली. त्यांनी साधे, सोपे पण निश्चित वैज्ञानिक मूल्य असलेले प्रयोग आज सादर केली. अनेक वैज्ञानिक संकल्पनांना उजाळा मिळाला. अनेक वैज्ञानिक सूत्रे नव्यानी मांडली गेली. दोन वर्षे कोरोनामुळे वाया गेली की काय ? अशी भिती निरर्थक ठरली. हे सर्व करताना विद्यार्थ्यांचा उत्साह मोठा दांडगा होता. सर्वांची अगदी लगबग चालली होती. प्रत्येक सहभागी विद्यार्थी प्रयोगाच्या तयारीत गुंग होता. अगदी पहिलीपासून चौथीपर्यंतचे सर्व वर्गातील विद्यार्थी आनंदाने सहभागी झालेले होते.प्रत्येक विद्यार्थ्याठायी वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, सश्रद्ध पिढी निर्माण व्हावी, अंदाजांचे पतंग न उडवता निश्चित निर्णयाप्रती ठाम असणारी मुले घडवण्याचा एक छोटासा प्रयत्न .
या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आरती वाघमारे यांनी प्रथम विद्यार्थ्यांना प्रयोग प्रात्यक्षिक दाखविले नंतर विद्यार्थ्यांनी आपले प्रयोगाचे मांडणी करून स्पष्टीकरण सांगितले यानंतर श्री राऊत सर यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व समजावून सांगितले या प्रयोगांचे क्रमांक काढण्यात आले व विजेत्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आलं अशाप्रकारे आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रमेश भोये यांनी खूप मोलाचे सहकार्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा