शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक १

 

शाळा पूर्वतयारी  मेळावा क्रमांक १

जि. प. प्रा. शाळा लहानघोडी ता सुरगाणा जिल्हा नाशिक येथे शाळा पुर्वतयारी कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

  सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमांमध्ये प्रथमतः गावामध्ये प्रभात फेरी काढून शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आमंत्रण देण्यात आले. त्यानंतर उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेषा शाळेच्या मुख्याध्यापिका आरती वाघमारे यांनी सांगितले. नंतर पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.शाळा स्थापन समिती अध्यक्ष श्री . देविदास  भोये यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी सेविका सौ कमलबाई कामडी व मदतनीस यांनी मेळाव्याच्या ठिकाणी लावलेल्या स्टॉलची माहिती सांगितले. स्वयंसेवक यांनी विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार कृती करून घेण्यात आल्या.  सेल्फी पॉइंट हे या कार्यक्रमाचे आकर्षण होते सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सेल्फी काढल्या. या कार्यक्रम प्रसंगी गावातील ज्येष्ठ व्यक्ती व्यवस्थापन समिती सदस्य गावातील पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर श्री. राऊत सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले. 

🌼काही क्षणचित्रे🌷













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा