लहानघोडी येथे सीड बँक (बिज पेढी) उदघाटन.

 



       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी केंंद्र - माणी ता. सुुुुरगाणा जिल्हा नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा घेण्यात  आली. शाळेतील विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ दाखविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती वाघमारे यांनी  बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल माहिती सांगितली. 

    तसेच शाळेमध्ये सीड बॅक (बिज पेढी)  या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. श्री.राऊत यांनी या उपक्रमाची माहिती सांगितली. सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व झाडांमुळेच अस्तित्वात आहे. मनुष्याला जीवनावश्यक वस्तू जसे अन्न, हवा, पाणी, दवा औषधी या झाडांकडूनच मिळतात. म्हणून म्हटले जाते की *झाडे लावा झाडे जगवा*.
       झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत: बियांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. चिकू, बोर, चिंच, साग, वड, इ. जंगलातील झाडांच्या बियांचा संग्रह करण्यात आला आहे. तसेच परसबागेतील बियांचा संग्रह केलेला आहे. या संग्रह केलेल्या बियांसाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिशव्यांमध्ये माती भरून जून महिन्यात बियांची पेरणी करण्यात येईल. नंतर त्याअ रोपांचे संवर्धन करुन रोपांची लागवड शाळेतील परीसरात व गावामध्ये लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रम प्रसंगी मोठीघोडी येथील श्री. गावित सर, श्रीम.बंगाळ मॅडम, तसेच लहानघोडी गावातील पालक, ग्रामस्थ, शा. व्या. स. अध्यक्ष श्री. देविदास भोये व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा