सहयाद्री शिक्षणरत्न पुरस्कार 2019-20


सहयाद्री शिक्षणरत्न पुरस्कार 2019-20


मधुकर राऊत यांना सहयाद्री शिक्षणरत्न पुरस्कार                                                                                                                                   
राज्यस्तरीय सहयाद्री शिक्षणरत्न पुरस्कार जि.प.प्रा.शाळा - लहानघोडी ता.सुरगाणा जि. नाशिक येथे कार्यरत असलेले प्रा.शिक्षक श्री. मधुकर काशिनाथ राऊत यांना अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते पंचगणी, महाबळेश्वर येथे (दि.३१) रोजी प्रदान करण्यात आला.सह्याद्री उदयोग समूह अहमदनगर या राज्यस्तरावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेमार्फत राज्यातील उपक्रमशिल व प्रतिभावंत शिक्षकांकडून प्रस्ताव मागाविण्यात आले होते.श्री. राऊत यांनी जि.प.सिंधुदुर्ग असताना गणित उपक्रम अंतर्गत माझी चौरस पाटी या पुस्तकचे लेखन करून प्रकाशित केले. तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुका व जिल्हास्तर प्रथम क्रमांक मिळविला आहे .त्यामध्ये हसत खेळत शैक्षणिक साहित्या निर्माण करून मुलांसाठी उपयोग केला . जि.प. नाशिक येथील सुरगाणा तालुकास्तारीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून गणित मास्टर या उपक्रमातुन मुलांना गणिती क्रिया सहज व सोप्या पद्धतीने करता येतील असे शालेय नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत या कार्याचा आढावा घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
श्री. मधुकर राऊत यांना गटशिक्षणाधिकारी श्री.एस.पी.कुसाळकर, केंद्रप्रमुख श्री.एस.आर.कोर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा