जागतिक महिला दिन साजरा

 जागतिक महिला दिन साजरा


       8 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच स्वातंत्र्याचा महोत्सव या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले.       शाळेच्या मुख्याध्यापिका  वाघमारे मॅडम यांनी  कर्तृत्ववान स्त्रिच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः शुभेच्छा कार्ड तयार करून आपल्या घरातील आई बहीण आजी किंवा गावातील चांगले काम करणारी महिला यांना  भेट कार्ड देण्याचा उपक्रम राबविला. 
     या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या सौ. कमलबाई कामडी याने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा