लहानघोडी येथे ‍महिला दिन साजरा.

 


लहानघोडी येथे जागतिक ‍महिला दिन साजरा.

दिपाली मुकुंदा कामडी वेषभूषा स्पर्धेत प्रथम

    सुरगाणा तालक्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा लहानघोडी ता. सुरगाणा जि. नाशिक येथे जागतिक ‍ महिला उत्साहात साजरा करण्यात आला. जागतीक महिला दिनानिमित्त अंगणवाडी व शाळेच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.‍ या  कार्यक्रमास ग्राम पंचायत सदस्या सौ.भागाबाई भोये उपस्थित होत्या, त्यांनी उपस्थित महिलांसमोर आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री.मधुकर काशिनाथ राऊत यांनी जागतीक महिला दिनाचे महत्व सांगीतले. मोठीघोडी येथील शिक्षक श्री.गंगाधर  गावित यांनी  मुलींनी शिकून पुढे जावे. शिक्षणापासुन कोणतेही मुल वंचीत राहु नये. तसेच ग्रामिण गातील महीला हया खुप चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात त्याना फक्त योगे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. कमलबाई कामडी यांनी जगातील प्रमुख कतृत्ववान महीलांबाबत माहीती सांगीतली.

    शाळेमार्फत मुलींची वेशभुषा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. वेशभुषा स्पर्धेत प्रथम कु.दिपाली मुकूंदा कामडी व्दितीय क्रमांक कु.योगीता लक्ष्मण धुळे तृतीय क्रमांक कु.रोहीणी शिवराम चौधरी हिने पटकावला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.पुंडलिक बन्सु भोये यांच्या हस्ते  विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमास कोरोना नियमांचे काटेकोर पालन करुन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास सौ. हौसाबाई मोरे अंगणवाडी मदतनीस, सौ.इंदुबाई मोरे अंगणवाडी सेविका ( मोठीघोडी ) सौ.आरती वाघमारे यांनी सहकार्य केले  तसेच शा.व्य.समिती सदस्य व गावातील  महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा