20 मार्च जागतिक चिमणी दिवस


*जागतिक चिमणी दिवस*


थोड पाणी झाडाला🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌳🌳🌳🌳

थोड दाने पाणी चिमणीला🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. लहानघोडी पो .माणी ता .सुरगाणा जि. नाशिक *

    शाळा बंद ,उपक्रम सुरु

🐤🐣🐥🦆🦅🐔🐧

   

‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जनजागृती करणे,तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करुण देणे.हे संस्कार शालेय जीवनात घडवून यावेत.  

======================================

*🙏चिमण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करा.🙏*

*( २० मार्च जागतिक चिमणी दिनानिमित) 

           

🌎 *मी पाहिलेली चिऊताई ( चिमणी )*🌎


  चिमणीचा चिवचिवाट न ऐकलेला माणूस विरळच 

म्हणवा लागेल. अगदी तान्ह्या बाळाला सुध्दा 

'चिऊताई ' माहीत असते. रात्रीच्या वेळी थव्यांनी 

एकत्र राहणा-या चिमण्या दिवसा जोडीजोडीने 

किंवा छोट्या थव्यांनी खाद्य शोधत हिंडतात. दुपारी 

मात्र थोडी विश्रांती घेतात. 

    करड्या रंगाच्या या इटुकल्या चिमण्या नेहमी 

कामात असतात. एकतर वर्षातून तीन - चार वेळा 

वीण होते. त्यामुळे घरट्यात नेहमीच पिल्लं वाढत असतात. पिल्लांचं खाद्य म्हणजे छोटे कीटक आणि अळ्या. त्या पकडून आणणं, भरवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरटं स्वच्छ करणं या कामामध्ये चिमण्या दंग असतात. बारकाईनं बघा चिमणा - चिमणीत फरक असतो. 

    अधूनमधून दाणे टिपणा-या ह्या छोट्या चिमण्या 

पिकांवर येणारे कीटक, आणि त्यांच्या अळ्या 

खाऊन शेतक-यांना फार मदत करतात. मूर्ती लहान 

पण कीर्ती महान असंच काहीसं म्हणता येईल 

आपल्या चिऊताई बद्दल

चिमणीसाठी जनजागृतीची होणे गरजेचे आहे.

 चिमण्यांना विसावा मिळावे म्हणून घरटे तयार करणे.आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.

*चला तर आपल्यातील माणुसकी धर्म जपण्यासाठी पक्ष्यांच्या निवासाची व दाणा-पाणी ठेवाण्यासाठी *

======================================

🐦🐦🐦🐦🐦

*जागतिक चिमणी दिवस*

🐦🐦🐦🐦🐦

  *चिमणी वाचवा अभियान* 

20 मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस जगभर साजरा करण्यात येत आहे.

एरव्ही अंगणात, घरात आणि अनेकदा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणाऱ्या चिऊताईचे आता दर्शन होणेही मुश्किल बनले आहे. शहरांतील वाढती सिमेंटची जंगले आणि ग्रामीण भागात होणारी अवैध वृक्षतोड यामुळे चिऊताई दिसेना झाली आहे. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटत चालली असल्याचे दिसत आहे. चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 सध्या उन्हाळा सुरू झाल्याने पक्ष्यांना पाणी  मिळावे यासाठी आपल्या घराजवळ,पक्ष्यांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपलब्ध टाकाऊ साहित्याचा वापर करुन या उन्हाळ्यात  चिमण्यांना पाणी व  धान्य उपलब्ध करुन द्या. हा उपक्रमाची अंमलबजावणी करतानाचा  विद्यार्थ्यांचा एक फोटो पाठवा.🙏🐦🐦🐦🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा