मंगळवार, २९ जुलै, २०२५

जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांने प्रामाणिकपणे मोबाईल केला परत



 जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांने प्रामाणिकपणे मोबाईल केला परत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - लहानघोडी ता.सुरगाणा जि. नाशिक शाळेतील विद्यार्थी संकेत कैलास पवार ३री व पंकज जगदिश ठाकरे इयत्ता ३ री हे दुपारच्या सुट्टी मध्ये घरी जात असताना रस्त्यावर मोबाईल पडलेला आढळला आजुबाजुला पाहिले कोणीही नव्हते. त्यांनी मोबाईल उचला व शाळेच्या मुख्याध्यापिक आरती वाघमारे यांच्याकडे जमा केला. लहानघोडी शाळेतील शिक्षिका आरती वाघमारे व मधुकर राऊत हे शाळेमध्ये विविध उपक्रम घेत असतात. त्या मध्ये *हरवले सापडले* हा उपक्रम तिन वर्षापासून सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत कोणाची वस्तू हरवली किंवा सापडली तर परत देण्यात येते. त्यानुसार त्यांनी मोबाईल शाळेमध्ये जमा केला. हा मोबाईल लहानघोडी ता.सुरगाणा जि नाशिक येथील श्री. देवराम गंगाराम पवार यांचा आहे असे समजले. त्यांना शाळेत बोलावून मोबाईल परत देण्यात आला. धावपळीच्या जिवनात कोणाची वस्तू सापडली तर कोणीही परत देत नाही. परंतु शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा पाहुन कौतूक केले तितके कमी आहे. गेल्या वर्षी दि.४।१२।२०२४ रोजी एक मोबाईल सापडला होता तो मोबाईल सुद्धा विदयार्थ्यांनी परत केला. बालवयामध्ये मुलांनचा प्रमाणिकपणा पाहून इतर विद्यार्थ्यांनी प्रमाणिकपणे रहायला पाहिजे. याचे जिवंत उदाहरण मुलांनी अनुभवले. सदर विद्यार्थांचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.