प्रयास फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप


प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट मुंबई यांचे तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप जि. प. प्रा. शाळा- लहानघोडी ता. सुरगाणा जिल्हा नाशिक  येथे करण्यात आले.

प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट मुंबई यांचे तर्फे प्रत्येक वर्षी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे सन 2022-23 या वर्षी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाट्या, पेन्सिली एकेरी वही, दुरेघी वही, चौकोनी वही, चौरेघी वही, शिसपेन्सिल खोडरबर, शॉपनर, इत्यादी साहित्य शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. 

        या कार्यक्रम प्रसंगी बिवळ शाळेतील शिक्षक श्री. नाना भोये सर, मोठीघोडी शाळेतील शिक्षक श्री. गंगाधर गावित सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती वाघमारे मॅडम व श्री राऊत सर उपस्थित होते. 

      शाळेच्या मुख्याध्यापिका आरती वाघमारे यांनी  प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट मुंबई यांचे कार्य खूप महत्त्वाचे आहे व खरोखर जे गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ट्रस्ट खूप चांगले कार्य करीत आहे प्रयास फाउंडेशन यांचे आमच्या शाळेच्या वतीने आभार व खूप खूप धन्यवाद.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा