शनिवार, १५ जून, २०२४

प्रवेशोत्सव 2024-25 शाळा -लहानघोडी ता सुरगाणा जि नाशिक

 


       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे शैक्षणिक वर्ष सन 2023-24 या वर्षामधील पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . पहिल्या दिवशी इयता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी आठ वाजता गावामध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच नवोगतांंचे स्वागत करण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप  करण्यात आली . या कार्यक्रमासाठी मा . सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदस्य,अंगणवाडी ताई, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.