लहानघोडी शाळेत शिवजयंती साजरी


19 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. तसेच स्वातंत्र्याचा महोत्सव या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका  वाघमारे मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषण केलेत व पुढील कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांच्या रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये श्री छत्रपती शिवाजी ह्यांच्या किल्ल्यांचे चित्र विद्यार्थ्यांना देण्यात आली व या चित्रांमध्ये रंग भरून घेण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र देऊन रंगभरण घेण्यात आले या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिक्षक श्री. राऊत सर यांनी आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले . 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा