गुणगौरव समारंभ 2021-22

 एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे साजरा करण्यात आला. व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तसेच शाळेमध्ये शैक्षणिक वर्षे 2021 22 या वर्षांमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले त्या उपक्रमाचे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सन 2022-23 पुढील वर्षीच्या कार्यक्रमाचे रूपरेषा तयार करण्यात आली. तसेच मीनाक्षी लहानु ठाकरे इयत्ता चौथी या विद्यार्थिनीने शाळेसाठी सरस्वती मातेची प्रतिमा शाळेला भेट म्हणून दिली. त्यानंतर शाळेतील लावलेल्या केळीच्या झाडांचे पिकलेल्या केळ्यांची विद्यार्थ्यांना मेजवानी देण्यात आली.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा