श्री मधुकर राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

 🏆राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१🏆

  दोडामार्ग  एक्सप्रेस साहित्यिक  मंच पहिल्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय " आदर्श शिक्षक पुरस्कार आज दिनांक १७ / १० / २०२१ वार रविवार रोजी ऑनलाईन वितरीत करण्यात आले.

त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - लहानघोडी केंद्र - माणी ता . सुरगाणा जि. नाशिक येथील श्री . मधुकर काशिनाथ राऊत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. श्री. राऊत यानी लॉकडावून कालावधीत  घरोघरी शाळा, गणित मास्टर, मराठी मास्टर,   वृक्षसंवर्धनासाठी वृक्षाबंधन, शनिवार माझा आवडीचा, प्रश्नमंजुषा, शालेय रोपवाटीका, या सारखे नाविन्य पूर्ण उपक्रम त्यांनी वर्षभर राबवून मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले त्याबदल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

श्री . राऊत यांना मा.गटशिक्षणाधिकारी कोळी साहेब, विस्तार अधिकारी श्री. कुसाळकर साहेब, केंद्र प्रमूख श्री .कोर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळा व्य . समिती अध्यक्ष श्री . देविदास भोये , श्री. पुंडलिक भोये, सौ . कांताबाई वाघमारे, सौ. कमल कामडी, तसेच शाळा व्य. समिती सदस्य व गावातील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा