वाचनालय -धामणकुंड




*रूम टू रीड वाचनालयाचे धामणकुंड येथे उदघाटन*    दि. 9/03/2021 रूम टू रीड इंडिया ट्रस्ट आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण , नाशिक संस्थेच्या समन्वयाने

नाशिक जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर २०१९ पासून वाचनालय कार्यक्रमाची सुरुवात

करण्यात आली आहे. याकरिता संस्थेने जवळपास २ कोटी ४० लाख रुपये

आतापर्यंत खर्च केला आहे.या कार्यक्रमा अंतर्गत मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण

व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा

परिषदेच्या सर्व विद्यार्थी पर्यंत रूम टू रीड निर्मित ई-साहित्य पोहचवण्याचे कार्य देखील

नियमितपणे सुरू आहे."शाळा बंद शिक्षण सुरू" या मोहोमेचाच एक भाग म्हणून रूम टू रीड इंडिया ट्रस्ट मार्फत शाळा -- धामणकुंड 

केंद्र- माणी  तालुका सुरगाणा येथे केंद्रस्तरीय वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.

वाचनालयाच्या उदघाटन प्रसंगी पंचायत समिती सुरगाणा येथील गटशिक्षणाधिकारी मा.श्री.धनंजय कोळी साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.एस.पी.कुसाळकर साहेब 

व केंद्रप्रमुख मा.श्री.कोर साहेब  उपस्थित होते. तसेच बिवळ ग्रामपंचायत येथील सरपंच

श्री.भास्कर गांगुर्डे , श्री.मोतीराम देशमुख श्री.फुलाजी भोये श्री.लक्ष्मण सहारे श्री.चंद्रकांत सहारे 

श्री.नितीन भोये, श्री.भगवान राऊत श्री.प्रदीप चौधरी                  सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी बचाव अभियानचे तालुका अध्यक्ष श्री.अशोक भोये यांचे सहकार्य लाभले.🙏


वाचनालय संबधी संपूर्ण नियोजन धामणकुंड  शाळेचे मुख्याध्यापक श्री. भागवत धुम आणि वाचनालया संपूर्ण माहिती श्री सोनु देवरे यांनी दिली. याप्रसंगी नव्यानेच सुरगाणा तालुक्याचा गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार मिळालेल्या मा.श्री.धनंजय कोळी साहेब यांचा माणी 

केंद्रातर्फे सत्कार देखील करण्यात आला.

आभार श्री.भागवत धुम सर यांनी मानले. कार्यक्रमाला माणी  केंद्रातील सर्व शाळांचे

मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.


"रूम टूरीड इंडियायांनी सुरू केलेला वाचनालय उपक्रम आमच्या जिल्हा

परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल आणि

मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल, असा आत्मविश्वास

वाटतो." मा. धनंजय कोळी (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती-सुरगाणा)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा