आकाश कंदील स्पर्धा

आकाश कंदील स्पर्धा

      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे शनिवार माझा आवडीचा उपक्रम अंतर्गत  दिवाळीसाठी आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत टाकाऊ वस्तूंचा वापर करून शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आकाश कंदील तयार केले. या स्पर्धेत १) कु. मिनाक्षी लहानू ठाकरे २) योगीराज मुकुंदा कानडी ३) गौरी मोहन ठाकरे यांनी क्रमांक घेतले. 

      परीक्षक म्हणून गांगुर्डे सर शाळा मोरचोंडा हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक मधुकर राऊत व शाळेच्या मुख्याध्यापिका आरती वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा