तसेच शाळेमध्ये सीड बॅक (बिज पेढी) या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. श्री.राऊत यांनी या उपक्रमाची माहिती सांगितली. सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व झाडांमुळेच अस्तित्वात आहे. मनुष्याला जीवनावश्यक वस्तू जसे अन्न, हवा, पाणी, दवा औषधी या झाडांकडूनच मिळतात. म्हणून म्हटले जाते की *झाडे लावा झाडे जगवा*.
झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत: बियांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. चिकू, बोर, चिंच, साग, वड, इ. जंगलातील झाडांच्या बियांचा संग्रह करण्यात आला आहे. तसेच परसबागेतील बियांचा संग्रह केलेला आहे. या संग्रह केलेल्या बियांसाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिशव्यांमध्ये माती भरून जून महिन्यात बियांची पेरणी करण्यात येईल. नंतर त्याअ रोपांचे संवर्धन करुन रोपांची लागवड शाळेतील परीसरात व गावामध्ये लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रम प्रसंगी मोठीघोडी येथील श्री. गावित सर, श्रीम.बंगाळ मॅडम, तसेच लहानघोडी गावातील पालक, ग्रामस्थ, शा. व्या. स. अध्यक्ष श्री. देविदास भोये व सदस्य उपस्थित होते.
पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- नाशिक जिल्हा परिषद
- माझ्या आयी किटवाडी शाळेतील विदयार्थी
- शालेय अभिलेखे
- मोर पिसांची कलाकृती
- कला कार्यानुभव कलाकृती
- शालेय उपक्रम फोटो
- आठवणीतील क्षण आयी-केंद्र
- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
- सहयाद्री शिक्षणरत्न पुरस्कार 2019-20
- वर्तमान पत्र बातम्या
- श्री मधुकर राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
- परसबाग
- गणित मास्टर नवोपक्रम
- Science talent search examination
लहानघोडी येथे सीड बँक (बिज पेढी) उदघाटन.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा