बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

स्वतंत्र दिन खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - लहानघोडी केंद्र - माणी ता सुरगाणा जि नाशिक येथे आज दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी गावामध्ये ढोल ताश्यांच्या गजरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. गावातील पालक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात प्रभार फेरीमध्ये सहभागी झाले. शाळेमध्ये ध्वजावंदन करून विद्यार्थ्यांनी भाषणे केली. त्यामध्ये 

1)प्रथम क्रमांक - मंगेश ना. भोये

 2)दुसरा क्रमांक - देवयाणी अ. कुवर 

3) तिसरा क्रमांक - चेतन दिनकर जाधव

या विद्यार्थांना बक्षिस देऊन विद्यार्थी व पालकांचे स्वागत करण्यात आले.

तसेच शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू असतात त्या मध्ये *पाढे पाठांतर करूया खुप स्टार मिळवू या* या उपक्रमामध्ये 

1) प्रथम क्रमांक - *हर्षवर्धन मं. वार्डे* (इयत्ता - दुसरी) 

2) दुसरा क्रमांक - *तन्मय दे. वाघमारे* (इयत्ता - तिसरी) 

3) तिसरा क्रमांक - *मंगेश ना. भोये* ( इयत्ता ४ थी)

या विद्यार्थांना बक्षिस देऊन विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.

       तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना खेळासाठी खेळण्याचे साहित्य 

श्री. धनराज गांगुर्डे डायरेक्टर नार पार शेतकरी उत्पादक प्रा. लि .सुरगाणा ता सुरगाणा जि नाशिक* यांच्या मार्फत देण्यात आले. त्यामध्ये  फुटबॉल, कॅरम, रिंग, बुद्धीबळ , दोरीउडया, चेंडू*, इत्यादी खेळाचे साहित्य देण्यात आले . शा .व्य.समिती मार्फत आभार मानले.













शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

आदिवासी दिन 2024


     प्राथमिक शाळा लहानघोडी येथे जागतिक आदिवासी दिन 2024 साजरा.
     जि.प.प्राथमिक शाळा-लहानघोडी येथे आज जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थी आदिवाशी गणवेश घालून उपस्थित होते .जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरपंच मा. हेमलता भुसारे सदर कार्यक्रमास उपस्थित होते. मा सरपंच यांनी आदिवाशी दिनानिमित्त माहिती सांगुन आदिवाशी दिनाच्या व नागपंचमिच्या शुभेच्छा दिल्या. शा .व्य. समिती अध्यक्ष मा. नामदेव भोये यांनी आदिवाशी क्रांतीकरकांनी केलेल्या क्रांतीबदल माहिती सांगून क्रांती दिन व आदिवाशी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच हेमंत , भागवत , पुंडलिक भोये व ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती वाघमारे यांनी आदिवासी क्रांतिकारक यांचा इतिहास सांगितला.