गुरुवार, १८ जुलै, २०२४

शालेय परिसरात शोभिवंत झाडे वृक्षारोपण

जि प पा शाळा - लहानघोडी केंद्र - माणी ता सुरगाणा जि नाशिक येथे आज दि.18/7/2024 रोजी शाळेला शोभिवंत झाडे भेट देण्यात आली .

    श्री धनराज गांगुर्डे डायरेक्टर नार पार शेतकरी उत्पादक प्रा. लि .सुरगाणा ता सुरगाणा जि नाशिक यांच्या मार्फत जि. प. प्रा.शाळा -लहानघोडी या शाळेस शालेय परिसर शुशोभिकरण करण्यासाठी शोभिवंत झाडे शाळेस भेट देण्यात आली . सदर कार्यक्रमासाठी पालक ग्रामस्थ अंगणवाडी , शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते. या झाडांचे  शालेय परिसरामध्ये वृक्षारोपन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेस झाडे भेट दिल्याबदल आभार मानले .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा