मंगळवार, १२ मार्च, २०२४

बिवळ ग्रामपंचायत व लहानघोडी ग्रामस्थ यांच्या हस्ते स्वागत

         जि.प.प्रा.शाळा - लहानघोडी येथे श्री. मधुकर काशिनाथ राऊत यांच्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबदल गावकऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.
     श्री मधुकर काशिनाथ राऊत व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती वाघमारे हे  शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम घेत असतात. या उपक्रमाची दखल घेऊन नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाने श्री. मधुकर राऊत यांनी घेतलेल्या ' शोध गणित मास्टरचा ' या उपक्रमाचा समावेश हा 'शतक नाविण्यपूर्ण उपक्रमांचे' या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच इतर सर्व उपक्रमांची दखल घेऊन नवी दिशा नवे उपक्रम या समुहामार्फत गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 ने श्री मधुकर राऊत यांना सन्मानित करण्यात आले. 
 तसेच जि प प्रा शाळा - लहानघोडी या शाळेस ग्रामपंचायत स्तरावरून विज्ञान युगात आपले विद्यार्थी मागे राहूनये याची काळजी घेऊन शाळेसाठी संगणक संच उपलब्ध करून दिला आहे. या संगणकाचा वापर करून शाळेमधील विद्यार्थ्यांनी 'बॅक ऑफ लहानघोडी' या बचत बँकेचे ॲप विकसित करून विद्यार्थांना बाल वयातच बचतीची सवय लागावी व व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी बचत बँक स्थापन केली असून विद्यार्थी स्वतः दुपारच्या सुट्टीमध्ये हा बँक व्यवहार संगणकाचा वापर करून व ऑफलाईन सर्व व्यवहाराचा काटेकोर हिशोब ठेवतात. आज या बचत बँकचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन गावातील तरूण मित्रमंडळ  श्री. हेमंत भुसारे, भागवत पवार, विलास कामडी, हेमंत .मोरे .
 ग्रामपंचाय बिवळ यांच्या मार्फत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बिवळ ग्रामपंचायत  सरपंच मा. हेमलता, उपसरपंच श्री.भागवत ठाकरे,
        शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री देविदास भोये, ग्रामसेविका मा .श्रीम.चौधरी मॅडम मा. देविदास मोरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बागुल ,
माणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सी. पी महाले साहेब, मा.धुम सर शाळा- मोरचोंडा, मा. श्री देवरे सर व प्रमोद धुम सर शाळा - धामणकुंड, मा. श्रीम बंगाळ मॅडम शाळा - मोठीघोडी, ग्रामपंचायत मधील अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा चौधरी व भागी थोरात, श्रीमती इंदुबाई मोरे   गावातील ग्रामस्थ मा. केशव भुसारे, रमेश भोये, चंदर कामडी,    भोये बाबा   चंदर भोये नामदेव भोये मंगळ्या वार्डे ,दिनेश गायकवाड . श्रीमती, शेवंता बागुल ., हौसा मोरे . बिवळ, धामणकुंड,  मोठीघोडी, वडमाळ, लहानघोडी या गावातील ग्रामस्थ उपस्थित. या कार्यक्रमाचे नियोजन यांनी केले .


रविवार, ३ मार्च, २०२४


   श्री. मधुकर काशिनाथ राऊत यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहिर .

  नवी दिशा,नवे उपक्रम राज्य स्तरीय शैक्षणिक समूहाच्या वतीने दिनांक ९ मार्च २०२४ ला पुणे येथे शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पुस्तक प्रकाशन सोहळा, महाराष्ट्रातील गुणवंत १०४ शिक्षकांना राज्य स्तरीय गुणवंत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. गेल्या सात वर्षांपासून नवी दिशा,नवे उपक्रम समूह सातत्याने सुरू असून महाराष्ट्रातील शिक्षकांना उपक्रम दिशा देण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे.शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांना या समूहाचा फायदा होत आहे.समूहाच्या माध्यमातून, समूह सदस्यांच्या सहभागातून,देणगी दाते यांनी दिलेल्या मदतीने दरवर्षी नवनवीन सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात.
        यावर्षी महाराष्ट्रातील १०४ उपक्रमशील  शिक्षकांना एकत्रितकरून त्यांनी प्रत्यक्ष वर्गात राबविलेल्या उपक्रमांचे "शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे" पुस्तक तसेच यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन त्यांना राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी राजीव गांधी ईलर्निंग स्कूल सहकारनगर पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. संपादक मंडळाच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून भव्यदिव्य सोहळा निश्चितच संपन्न होणार आहे. अशी माहिती संपादक/समूह संयोजक श्री.देवराव चव्हाण यांनी दिलेली आहे. या सोहळ्याच्या तयारी , नियोजना करिता प्रकल्प प्रमुख श्री.आयुब शेख, श्री.बळीराम जाधव, मा.विजया महाडिक मॅडम, शीतल मदने, प्रवीण पोटे, गणेश कामथे, संगीता म्हस्के, श्रीकांत देवकर, सोपान बंदावणे, हेमलता चव्हाण, जयश्री जायभाये, मनिषा बोर्डे, ज्योत्स्ना पास्ते, संगीता बागुल आदी सर्व संपादक निर्मिती मंडळ दिनरात्र कष्ट घेताना दिसत आहे.

या पुस्तकात नाशिक जिल्हयातुन जि.प. प्राथमिक शाळा लहानघोडी ता . सुरगाणा जि नाशिक येथील  शिक्षक श्री . मधुकर काशिनाथ राऊत यांचा " शोध गणित मास्टरचा" या नवोपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे .

या सोबतच विजया महाडिक यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्य स्टॉल उभारणी, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे 'शिक्षकांसाठी सानेगुरुजी' या विषयावर व्याख्यान, शिक्षणविषयक विचार मंथनही होणार असल्याचे संपादकांनी सूचित केले आहे.