बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रीय विज्ञान दिन सोपे प्रयोग


 आज दिनांक 28/2/2024 रोजी जि.प.प्रा.शाळा लहानघोडी ता . सुरगाणा जि नाशिक येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजीत करण्यात आले. सर्व प्रथम विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो याबदल TV वरती महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण (CV Raman) यांनी केलेल्या कार्याचा व्हिडीओ दाखविण्यात आला . दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिवशी सर सीव्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध जाहीर केला. त्या नंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादरीकरण केले .
https://youtu.be/MgkhSBq2WiE?si=9U-t4UfE5z1_Twpo 

       विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला, सुप्त गुणांना आणि सर्जनशीलतेला सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळाली. दैनंदिन जीवन विज्ञानाशिवाय जगणे केवळ अशक्यच आहे असा संदेश देणारे आणि विविध प्रसंगात विज्ञानाच्या साथीने जीवननौका कशी पार करता येईल ? या दोन्ही अनन्यसाधारण गोष्टींची उकल सहजसोप्या अन् साध्या प्रयोगातून या प्रसंगी विद्यार्थ्यांनी केली. त्यांनी साधे, सोपे पण निश्चित वैज्ञानिक मूल्य असलेले प्रयोग आज सादर केली. अनेक वैज्ञानिक संकल्पनांना उजाळा मिळाला. सर्वांची अगदी लगबग चालली होती. प्रत्येक सहभागी विद्यार्थी प्रयोगाच्या तयारीत गुंग होता. अगदी पहिलीपासून चौथीपर्यंतचे सर्व वर्गातील विद्यार्थी आनंदाने सहभागी झालेले होते. प्रत्येक विद्यार्थ्याठायी वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, सश्रद्ध पिढी निर्माण व्हावी, अंदाजांचे पतंग न उडवता निश्चित निर्णयाप्रती ठाम असणारी मुले घडवण्याचा एक छोटासा प्रयत्न . 
   या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आरती वाघमारे यांनी प्रथम विद्यार्थ्यांना प्रयोग प्रात्यक्षिक दाखविले नंतर विद्यार्थ्यांनी आपले प्रयोगाचे मांडणी करून स्पष्टीकरण सांगितले यानंतर श्री राऊत सर यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व समजावून सांगितले .शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . रमेश भोये यांनी खूप मोलाचे सहकार्य केले .
https://youtu.be/MgkhSBq2WiE?si=9U-t4UfE5z1_Twpo