शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

2023-24 विज्ञान प्रदर्शन मनखेड येथे संपन्न

शैक्षणिक वर्षे सन २०२३-२४ या शेक्षणिक वर्षातील ५१ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन मनखेड ता.सुरगाणा जि नाशिक येथे पार पडले .

दि 29/12/2023 रोजी सुरगाणा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले . सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये बाल वैज्ञानिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या विज्ञान प्रतीकृती व प्रयोग सादर केले. हे प्रदर्शन पहाण्यासाठी विज्ञान प्रेमीची मोठ्या प्रमाणात दोन दिवस गर्दी झाली. विज्ञान प्रदशनाचे नियोजन खुप चांगले होते .

 या प्रदर्शनामध्ये जि . प .प्रा .शाळा लहानघोडी ता सुरगाण विद्यार्थी प्रतिकृती मध्ये *मोहित हेमराज ठाकरे इ. ४ थी यांनी गणित प्रतीकृती सादर केली व शिक्षक प्रतिकृती मध्ये श्री मधुकर राऊत यांने गणित यान प्रतिकृती सादर करून सहभाग घेतला .

इतर फोटो 







de




शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

प्रयास फाउंडेशन मार्फत स्वेटर वाटप

दि 14/12/2023 रोजी जि.प.प्रा.शाळा लहानघोडी ता.सुरगाणा जि नाशिक या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप.

             जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - लहानघोडी ता.सुरगाणा जि. नाशिक येथे प्रयास फाऊंडेशन वाशी मुंबई यांच्याकडून शाळेतील इ १ली ते ४थी च्या सर्व विद्यार्थांना स्वेटर वाटप करयात आले .
               थंडीच्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण व्हावे या उदेशाने विद्यार्थांना स्वेटर वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती वाघमारे यांनी प्रयास फाऊंडेशन यांच्या मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते असे सांगीतले. शाळा व्या समिती गावातील ग्रामस्थ पालक यांनी प्रयास फाऊंडेश ट्रस्ट यांचे आभार मानले . श्री .मधुकर राऊत यांनी प्रयास फाउंडेशन ट्रस्ट व तेथील कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबदल आभार मानले .




बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

केंद्र स्तरीय जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा


जिल्हापरिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा सन 2023 -24

दिनांक 13/12/2023 रोजी जिल जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा जिल्ह परिषद प्राथमिक शाळा उंबरदे मा.येथे घेण्यात आल्या सदर स्पर्धेत *जि .प. प्राथमिक शाळा लहानघोडी* येथील विद्यार्थ्यांनी *समुह नृत्य लहान गट प्रथम क्रमांक* 
वैयक्तीक नृत्य लहान गट *व्दितीय क्रमांक*
चित्रकला स्पर्धा *व्दितीय क्रमांक*
प्राप्त केला सर्व विद्यार्थांचे स्वागत .










शनिवार, २ डिसेंबर, २०२३

लहानघोडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप


    दि 02/12/2023 रोजी जि.प.प्रा.शाळा लहानघोडी ता.सुरगाणा जि नाशिक या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्य वाटप.
              शैक्षणिक वर्षाच्या व्दितीय सत्रासाठी विद्यार्थ्यांन आज  शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्री. केशव भुसारे यांच्या प्रयत्नातून आज शेळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन , पेन्सील इ.साहित्य वाटप करण्यात आले. श्री केशव भुसारे यांच्या प्रयत्नातून शाळेतील विद्यार्थांना प्रत्येक वर्षी मदत होत असते. विद्यार्थ्यांना आवश्यक अलेले साहित्य त्यांनी प्राप्त करून दिले आहे. त्याबदल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . आरती वाघमारे यांनी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानले तसेच बिवल ग्रामपंचाय सरपंच सौ. हेमलता भुसारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन केले. या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायात सदस्य श्री. लहानू ठाकरे, यांनी विद्यार्थ्यांनी व्दितीय सत्र सुरु होत आहे तरी विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य आवश्यक आहे हे साहित्य प्राप्त झाल्याबदल त्यानी आभार मानले . श्री .हेमंत भुसारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
       या कार्यक्रमास व बिवळ ग्रामपंचात. सरपंच सौ. हेमलता भुसारे श्री. हेमराज ठाकरे श्री . हेमंत भुसारे  श्री. रमेश भोये. श्री.केशव भुसारे सौ. यमुना गायकवाड सौ .कल्पना भोये सौ. कलावती भोये. सुरेश पवार श्री . दिनेश गायकवाड तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते श्री.मधुकर राऊत यांनी आभार मानले
 ------------+++++++------------