बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

लहानघोडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप . .

आज दिनांक 02/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे Buntes Sangha nashik ( मावळा संघ नाशिक ) यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी व मोठीघोडी या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य बॅग,छत्री, पेन,खोडरबर , शॉर्पनर, खोडरबर , बिस्कीटपुडे , चॉकलेट  वाटप करण्यात आले . सदर कार्यक्रम प्रसंगी मावळा संघ नाशिक  येथील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते. Bunts Sangha  अध्यक्ष यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले . यामध्ये त्यांनी सांगीतले की आम्ही सुद्धा तुमच्या सारखे लहान असताना जि.प. च्या शाळेत शिक्षण घेतले . व आज अधिकारी इंजिनियर झालो. हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यामागे आपण सुद्धा मोठे झाल्यावर ज्यांना खरच गरज आहे त्यांना मदत करा असे सांगीतले.   गावच्या सरपंच श्रीमती. हेमलता हेमंत भुसारे यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना सदर साहित्य प्राप्त झाली आहे. या कार्यक्रमासाठी श्री केशव भुसारे, हेमंत भुसारे, शा.व्य. समिती अध्यक्ष श्री. देविदास भोये श्रीम. कमल कामडी, श्रीम.आरती वाघमारे तसेच गावातील पालक व  ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची रूपरेषा व महत्व श्री. राऊत सर यांनी सांगीतली  व श्रीम. मिलिंदेश्वरी बंगाळ यांनी आभार मानले .