शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

2023-24 विज्ञान प्रदर्शन मनखेड येथे संपन्न

शैक्षणिक वर्षे सन २०२३-२४ या शेक्षणिक वर्षातील ५१ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन मनखेड ता.सुरगाणा जि नाशिक येथे पार पडले .

दि 29/12/2023 रोजी सुरगाणा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले . सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये बाल वैज्ञानिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या विज्ञान प्रतीकृती व प्रयोग सादर केले. हे प्रदर्शन पहाण्यासाठी विज्ञान प्रेमीची मोठ्या प्रमाणात दोन दिवस गर्दी झाली. विज्ञान प्रदशनाचे नियोजन खुप चांगले होते .

 या प्रदर्शनामध्ये जि . प .प्रा .शाळा लहानघोडी ता सुरगाण विद्यार्थी प्रतिकृती मध्ये *मोहित हेमराज ठाकरे इ. ४ थी यांनी गणित प्रतीकृती सादर केली व शिक्षक प्रतिकृती मध्ये श्री मधुकर राऊत यांने गणित यान प्रतिकृती सादर करून सहभाग घेतला .

इतर फोटो 







de




शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

प्रयास फाउंडेशन मार्फत स्वेटर वाटप

दि 14/12/2023 रोजी जि.प.प्रा.शाळा लहानघोडी ता.सुरगाणा जि नाशिक या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप.

             जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - लहानघोडी ता.सुरगाणा जि. नाशिक येथे प्रयास फाऊंडेशन वाशी मुंबई यांच्याकडून शाळेतील इ १ली ते ४थी च्या सर्व विद्यार्थांना स्वेटर वाटप करयात आले .
               थंडीच्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण व्हावे या उदेशाने विद्यार्थांना स्वेटर वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती वाघमारे यांनी प्रयास फाऊंडेशन यांच्या मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते असे सांगीतले. शाळा व्या समिती गावातील ग्रामस्थ पालक यांनी प्रयास फाऊंडेश ट्रस्ट यांचे आभार मानले . श्री .मधुकर राऊत यांनी प्रयास फाउंडेशन ट्रस्ट व तेथील कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबदल आभार मानले .




बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

केंद्र स्तरीय जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा


जिल्हापरिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा सन 2023 -24

दिनांक 13/12/2023 रोजी जिल जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा जिल्ह परिषद प्राथमिक शाळा उंबरदे मा.येथे घेण्यात आल्या सदर स्पर्धेत *जि .प. प्राथमिक शाळा लहानघोडी* येथील विद्यार्थ्यांनी *समुह नृत्य लहान गट प्रथम क्रमांक* 
वैयक्तीक नृत्य लहान गट *व्दितीय क्रमांक*
चित्रकला स्पर्धा *व्दितीय क्रमांक*
प्राप्त केला सर्व विद्यार्थांचे स्वागत .










शनिवार, २ डिसेंबर, २०२३

लहानघोडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप


    दि 02/12/2023 रोजी जि.प.प्रा.शाळा लहानघोडी ता.सुरगाणा जि नाशिक या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्य वाटप.
              शैक्षणिक वर्षाच्या व्दितीय सत्रासाठी विद्यार्थ्यांन आज  शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्री. केशव भुसारे यांच्या प्रयत्नातून आज शेळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन , पेन्सील इ.साहित्य वाटप करण्यात आले. श्री केशव भुसारे यांच्या प्रयत्नातून शाळेतील विद्यार्थांना प्रत्येक वर्षी मदत होत असते. विद्यार्थ्यांना आवश्यक अलेले साहित्य त्यांनी प्राप्त करून दिले आहे. त्याबदल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . आरती वाघमारे यांनी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानले तसेच बिवल ग्रामपंचाय सरपंच सौ. हेमलता भुसारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन केले. या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायात सदस्य श्री. लहानू ठाकरे, यांनी विद्यार्थ्यांनी व्दितीय सत्र सुरु होत आहे तरी विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य आवश्यक आहे हे साहित्य प्राप्त झाल्याबदल त्यानी आभार मानले . श्री .हेमंत भुसारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
       या कार्यक्रमास व बिवळ ग्रामपंचात. सरपंच सौ. हेमलता भुसारे श्री. हेमराज ठाकरे श्री . हेमंत भुसारे  श्री. रमेश भोये. श्री.केशव भुसारे सौ. यमुना गायकवाड सौ .कल्पना भोये सौ. कलावती भोये. सुरेश पवार श्री . दिनेश गायकवाड तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते श्री.मधुकर राऊत यांनी आभार मानले
 ------------+++++++------------







सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

लहानघोडी शाळेचा भाऊबिज कार्यक्रमात उत्तेजनार्थ पारितोषिक


       दि .15-11-20230 रोजी लहानघोडी येथे  भाऊबिज निमित सांस्कृतीक  कार्यक्रमात  घेण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये 25 गावातील कलापथक सहभागी झाले होते. या सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये जि . प . प्रा . शाळा - लहानघोडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सदर नृत्यास  उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले . विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्याचे ग्रामस्थांनी पालकांनी कौतुक केले . 

     या नृत्यासाठी गावातील ग्रामस्थांकडून भरघोस देणगी देण्यात आली या नृत्यसाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले .





मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

आपली शाळा,आपली .

आपली शाळा आपली बातमी

https://youtube.com/@MadhukarRaut-mm2lk?si=nAi0_AYVRfpUbLoS 


 आपल्या शाळेतील शालेय नवोपक्रम, शालेय कार्यक्रम, विद्यार्थी उपक्रम , विद्यार्थी कलाकृती, कला, कार्यानुभव शा . शिक्षण मधील नविन कृती यांची बातमी देण्यासाठी संपर्क करा बातमी देण्यासाठी खालिल Whatsapp* ग्रुपला जॉईन व्हा .

तुम्ही जर *माझी शाळा माझी बातमी* चॅनलला नवीन असाल तर चॅनलला *लाईक, सबस्क्राईब आणि शेअर* करायला विसरू नका.

 *Whatsapp* ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील 👇लिंक ला क्लिक करा.


*https://chat.whatsapp.com/GOFb1HCKWsqFpwBzLfMsNm*

-------------------------***********-------------------------- ****बतमी ****

1.








***********

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

लहानघोडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप . .

आज दिनांक 02/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे Buntes Sangha nashik ( मावळा संघ नाशिक ) यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी व मोठीघोडी या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य बॅग,छत्री, पेन,खोडरबर , शॉर्पनर, खोडरबर , बिस्कीटपुडे , चॉकलेट  वाटप करण्यात आले . सदर कार्यक्रम प्रसंगी मावळा संघ नाशिक  येथील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते. Bunts Sangha  अध्यक्ष यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले . यामध्ये त्यांनी सांगीतले की आम्ही सुद्धा तुमच्या सारखे लहान असताना जि.प. च्या शाळेत शिक्षण घेतले . व आज अधिकारी इंजिनियर झालो. हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यामागे आपण सुद्धा मोठे झाल्यावर ज्यांना खरच गरज आहे त्यांना मदत करा असे सांगीतले.   गावच्या सरपंच श्रीमती. हेमलता हेमंत भुसारे यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना सदर साहित्य प्राप्त झाली आहे. या कार्यक्रमासाठी श्री केशव भुसारे, हेमंत भुसारे, शा.व्य. समिती अध्यक्ष श्री. देविदास भोये श्रीम. कमल कामडी, श्रीम.आरती वाघमारे तसेच गावातील पालक व  ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची रूपरेषा व महत्व श्री. राऊत सर यांनी सांगीतली  व श्रीम. मिलिंदेश्वरी बंगाळ यांनी आभार मानले .






शुक्रवार, १४ जुलै, २०२३

नवोपक्रम स्पर्धा 2022 23


 आज दिनांक १४/०७/२०२३ वार शुक्रवार रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक येथे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धा जिल्हास्तरीय पारितोषिक  वितरीत  करण्यात आले.

त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - लहानघोडी केंद्र - माणी ता . सुरगाणा जि. नाशिक येथील श्री . मधुकर काशिनाथ राऊत यांनी "शोध गणित मास्टरचा " हा नवोपक्रम सादर केला होता सदर नवोपक्रमास सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले सदर पारितोषिकाचे वितरण नाशिक डायटचे प्राचार्य मा.श्री. अनिल गौतम, जेष्ट अधिव्याख्याता श्री. डी डी.सुर्यवंशी,  अधिव्याख्याता तथा समन्वयक नवोपक्रम स्पर्धा श्री. सुनिल बाविस्कर यांच्या हस्ते देण्यात आला. 





https://youtu.be/THZ3S54Ipl4



बुधवार, २१ जून, २०२३

 
प्रयास फाउंडेशन ट्रस्ट यांच्या कडून जि .प.प्रा.शाळा- लहानघोडी शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप. 

    आज दिनांक 21 जुन 20230रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- लहानघोडी केंद्र माणी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे प्रयास फाउंडेशन ट्रस्ट  यांच्या कडून शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना दुरेघी वही, एकेरी वही, चौरेघी वही, चौकोणी वही, पाटी, पेन्सील, पेन, खोडरबर, इत्यादी वस्तू शाळेतील विद्यार्थांना मोफत वाटप करण्यात येते त्या प्रमाणे या वर्षीही जि.प. प्रा . शाळा लहानघोडी येथील सर्व विद्यार्थ्यांना शाळेसाठी उपयोगी शैक्षणिक साहित्य देण्यात आले . या कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री देविदास भोये गावातील ग्रामस्थ महिला व पालक  उपस्थित होते. शाळेतील पालक वर्गाकडून प्रयास फाउंडेशन ट्रस्ट यांचे मनपूर्वक आभार मानले .




शनिवार, २९ एप्रिल, २०२३

शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.1


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे दि.29/4/2023 रोजी शाळापूर्व तयारी मेळावा क्र.१ आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी  शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. सकाळी आठ वाजता गावामध्ये  दाखल होणाऱ्या बालकांची  मिरवणूक काढण्यात आली . गावातील सरपंच यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्यामध्ये सात स्टाॅल लावण्यात आले. दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकडून कृती पुर्ण करून घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदस्य, अंगणवाडी ताई, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.