मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

आदिवासी नृत्य लहानघोडी प्रथम क्रमांक

*१५ नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जयंती*  निमित्त

ठिकाण:- जामले(ह) पो. दळवट ता. कळवण जिल्हा नाशिक

दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ वार. मंगळवार रोजी  विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या मध्ये *आदिवासी कला संस्कृती सांस्कृतिक स्पर्धा* या स्पर्धेत आदिवासी गीता मध्ये
*कलापथक लहानघोडी पो. माणी ता. सुरगाणा जिल्हा नाशिक* यांना 🏆 *प्रथम*  क्रमांकाचे  पारितोषिक मिळाले.
      सदर कार्यक्रमात आदिवासीची  झोपडी, शेतकरी, पावरी वादक, बिरसा मुंडा, हे खास आकर्षण ठरले. बिरसा मुंडेच्या भुमिकेत कु. दिप पवार वय अडीच वर्षे  खास पारितोषिक 750/- रुपये प्राप्त झाले तसेच प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व रोख 4004/-  रुपये मिळाले. सदर कार्यक्रमासाठी सर्व गावातील ग्रामस्थांनी खूप सहकार्य केले सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार.




बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

शेतकरी नृत्य प्रथम क्रमांक जि.प.शाळा लहानघोडी ता. सुरगाणा

आज दिनांक 26/10/2022 रोजी लहानघोडी गावामध्ये भाऊबीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.या कार्यक्रमात जि.प.प्रा.शाळा लहानघोडी केंद्र माणी ता. सुरगाणा जिल्हा नाशिक येथील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात शेतकरी नृत्य सादर केले व प्रथम क्रमांकाने विजयी झाले. सदर कार्यक्रमासाठी सौ. कमल कामडी यांनी गीत गायन केले व श्री राऊत सर आरती मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर  गीतासाठी पालक यांनी सहकार्य केले प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री. देविदास भोये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व गावातील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. 






सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

लहानघोडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाई वाटप.
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे आज दिनांक 29/8 /2022 रोजी कुमार यश महेंद्र पाडवी याच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या व पेन तसेच मिठाई वाटप करण्यात आली. श्री पाडवी यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून शाळेतील मुलांना साहित्य तसेच मिठाई वाटप करून साजरा केला या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका शिक्षक तसेच विद्यार्थी व अंगणवाडीतील विद्यार्थी उपस्थित होते व सर्व विद्यार्थ्यांनी यशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

ज्ञानी मी होणार 15/8/2022

.🏅🏅🏅🏅 🏅15/8/2022🏆🏆🏆🏆🏆... 

प्रश्न क्र. १ आपल्या देशाचं नाव काय? 

उत्तर:- भारत. 

प्रश्न क्र. २- भारतीय राष्ट्रध्वज कोणता आहे ? 

उत्तर:- तिरंगा. 

प्रश्न क्र. ३- आपला भारत देश कधी स्वातंत्र्य झाला? 

उत्तर:- 15 ऑगस्ट 1947

प्रश्न क्र. ४- अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा? करतात? 

उत्तर:- 75 वर्षांनी.

प्रश्न क्र. ५- राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत व कोणते? 

उत्तर:- ९. तीन रंग. केशरी,पांढरा, हिरवा. 

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

लहानघोडी येथे स्वातंत्र्य दिन साजरा

आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी व गावातील पालक ग्रामस्थ यांच्यामार्फत गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. नंतर शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केशव भुसारे यांच्या सहकार्याने छत्री वाटप करण्यात आले. दीप भागवत पवार ह्या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींची वेशभूषा साकारून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्याचे व त्याच्या पालकाचे कौतुक करण्यात आले. महात्मा गांधीजींच्या जीवन कार्याविषयी शाळेतील मुख्याध्यापिका आरती वाघमारे यांनी महत्त्व सांगीतले तसेच शाळेमध्ये गावातील ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित राहून. कार्यक्रमाची शोभा वाढवली. 









मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

आदिवासी दिन साजरा 2022

जि प प्राथमिक शाळा लहानघोडी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा.
     जि. प. प्राथमिक शाळा लहानघोडी येथे आज जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व शाळेच्या मुख्याध्यापिका आरती वाघमारे यांनी आदिवासी क्रांतिकारक यांचा इतिहास सांगितला. 


गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

ज्ञानी मी होणार 5/8/2022


..🏅🏅🏅आजचे प्रश्न 5/8/2022🏆🏆🏆🏆.. 

प्रश्न क्र. १- भारताचे राजधानी कोणती? 

उत्तर:- नवी दिल्ली. 

प्रश्न क्र. २ - सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? 

उत्तर:- पूर्व. 

प्रश्न क्र. ३- शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? 

उत्तर:- शिवनेरी. 

प्रश्न क्र. ४- महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो? 

उत्तर:- एक मे. 

प्रश्न क्र. ५-भारताचा राष्ट्रध्वज कोणता? 

उत्तर:- तिरंगा. 

संकलन :- श्री. एम. के. राऊत

जि. प. प्रा. शाळा लहानघोडी 

केंद्र माणी . ता. सुरगाणा जि. नाशिक

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

ज्ञानी मी होणार. 4/8/2022

..🏅🏅🏅🏅🏅आजचे प्रश्न🏆🏆🏆🏆🏆.. 

प्रश्न क्र. १- एका आठवड्याचे दिवस किती

उत्तर:- सात

प्रश्न क्र. २ - एका वर्षामध्ये किती महिने असतात

उत्तर:- 12

प्रश्न क्र. ३- एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 

उत्तर:- 365  किंवा 366.

प्रश्न क्र. ४- आपल्या शरीरामध्ये एकूण किती हाडे आहेत? 

उत्तर:- 206.

प्रश्न क्र. ५- त्रिकोणाला किती बाजू असतात? 

उत्तर:- तीन

संकलन :- श्री. एम. के. राऊत

जि. प. प्रा. शाळा लहानघोडी 

केंद्र माणी . ता. सुरगाणा जि. नाशिक

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

ज्ञानी मी होणार 3/8/2022

...🏅🏅🏅🏅 🏅🏆🏆🏆🏆🏆... 

प्रश्न क्र. १- आपली ज्ञानेंद्रिये कोणती? 

उत्तर:- डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा. 

प्रश्न क्र. २- भारतीय राष्ट्रध्वज कोणता? 

उत्तर:- तिरंगा. 

प्रश्न क्र. ३- एक रुपया म्हणजे किती पैसे? 

उत्तर:- १०० पैसे. 

प्रश्न क्र. ४- मुख्य दिशा किती? 

उत्तर:-चार.

प्रश्न क्र. ५- एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती

उत्तर:- ९.

संकलन :- श्री. एम. के. राऊत

जि. प. प्रा. शाळा लहानघोडी 

केंद्र माणी . ता. सुरगाणा जि. नाशिक

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

सामान्य ज्ञान

 प्रश्न १  भारताची राजधानी कोणती? 

उत्तर :- दिल्ली. 

प्रश्न २ महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 

उत्तर:- एक मे.

प्रश्न ३. तिसरा आपल्या राजाचं नाव काय? 

उत्तर :- महाराष्ट्.

प्रश्न ४.मराठी महिने किती ? 

उत्तर :-12.

प्रश्न ५.आठवड्याचे वार किती ? 

उत्तर :- सात.

शालेय पोषण आहार करारनामा



तुषार पवार सर यांच्या ब्लॉग वरुन

खालील लिंक वर क्लिक करा. 

http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_985.html?m=1


गुरुवार, २८ जुलै, २०२२

धामणकुंड येथे शिक्षण परिषद संपन्न

    

दिनांक 28 जुलै 2022 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- धामणकुंड केंद्र-माणी.तालुका - सुरगाणा जिल्हा - नाशिक येथे शिक्षण परिषद संपन्न. 

      जुलै 2022 या महिन्यातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आज 28 जुलै 2022 वार गुरुवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- धामणकुंड या ठिकाणी घेण्यात आली सदर कार्यक्रमास माणी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री शिवाजी कोर साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. सदर शिक्षण परिषद ठीक दोन वाजता सुरू करण्यात आली. व एक ते आठ सत्र खेळणीच्या वातावरणात घेण्यात आले. सदर सत्र घेत असताना व्हिडिओ, चर्चा तसेच कृतीयुक्त पद्धतीने घेण्यात आले. महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था नवनियुक्त संचालक माननीय श्री भागवत धूम सर यांचा सत्कार केंद्राच्या वतीने करण्यात आला. सदर शिक्षण परिषदेचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणकुंड ,लहानघोडी मोठीघोडी, या शाळेने चांगल्या प्रकारे केले. 


सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

लहानघोडी येथे शिवजयंती साजरी

 






जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रम घेण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आरती वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या बद्दल  माहिती सांगितली नंतर विद्यार्थ्यांचे वकृत्व स्पर्धा घेण्यात आली तसेच किल्ले व शिवाजी महाराजांचे चित्र यांचे रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्याने सहभाग घेतला शाळेतील शिक्षक श्री राऊत याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

 

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

30 जानेवारी हुतात्मा दिन साजरा

  




जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे हुतात्मा दिन साजरा . 

३० जानेवारी २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- लहानघोडी केंद्र - माणी ता. सुरगाणा जिल्हा- नाशिक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व  शाळेमध्ये हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर शाळेमध्ये प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.आरती वाघमारे याने महात्मा गांधीच्या कार्याची माहिती दिली व स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर शाळा व शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. श्री राऊत सर याने स्वच्छता, खरे बोलणे , प्रामाणिकपणा याबद्दल माहिती सांगितली त्यानंतर महात्मा गांधीच्या आवडीचे भजन रघुपती राघव राजाराम हे भजन घेण्यात आले. 

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

राष्ट्रीय मतदार दिवस साजरा





आज हा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान केंद्र 182 अंतर्गत  लहानघोडी येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्र 182 चे बिल श्री मधुकर राऊत यांनी राष्ट्रीय मतदार  दिनाबद्दल माहिती सांगितली त्यानंतर मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच मतदान कार्ड वाटप करण्यात आले त्याच बरोबर दुरुस्ती व नवीन मतदार यादी याचे वाचन करण्यात आले. 

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान घोडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी. 

    आज दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- लहानघोडी केंद्र माणी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून   शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आरती वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांकडून सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री देविदास भोये गावातील ग्रामस्थ महिला व पालक  उपस्थित होते.