शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

लहानघोडी शाळेची दिनदर्शिका प्रकाशित

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी या शाळेचे नवीन वर्षानिमित्त दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली .

माझी शाळा माझी दिनदर्शिका या उपक्रमाअंतर्गत दिनांक 29/ 12/ 2021 ठिकाण उंबरदे मा. येथे माणी


बीटाचे विस्तार अधिकारी माननीय श्री. कुसाळकर साहेब व माणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कोर साहेब यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी माणी केंद्रातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर दिनदर्शिके मध्ये शालेय उपक्रम विद्यार्थ्यांचे फोटो विद्यार्थ्यांचे वाढदिवस तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राबवायचे उपक्रम यांचा समावेश करण्यात आलेला आहे दिनदर्शिका तयार करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. आरती  वाघमारे व श्री राऊत सर यांच्या संकल्पनेतून दिनदर्शिका तयार करण्यात आली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा