रविवार, ११ मार्च, २०१८

माझी चौरस पाटी

माझी चौरस पाटी
माझी चौरस पाटी हा उपक्रम जि. प. प्रा. शाळा आयी किटवाडी ता. दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये राबविलेला उपक्रम आहे. या उपक्रमामधुन  इयत्ता 1ली ते  5 वी च्या वर्गावर राबविलेला उपक्रम मुलांचे वय लक्षात घेऊन  या उपक्रमाची सांगड घातलेली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व ज्ञानरचनावाद या उपक्रामामध्ये भर देण्याचा प्रयत्न केलेला  आहे.

      या उपक्रमामध्ये  उपक्रमामध्ये मुलांना सहज उपलब्ध असणारे साहीत्य  असल्यामुळे अल्प खर्चीक आहे. त्यामुळे सर्व मुले सहभागी होऊ शकतात. चौकोणी वही व चौकोणी पाटी मुलांकडे सहज उपलब्ध होउ शकते.
‍विदयार्थी साहीत्य :- एक चौकोणी वही / चौकोणी पाटी, पेन्सील/खडु, तेलखडु इ.कह
शिक्षक साहीत्य :- एक 10 बाय 10 चौरस रेषा आखलेला फळा, खडु, डस्टर इ.
कृती :- शाळेमध्ये एक चौरस फलक तयार करुन घ्यावा.किंवा पाटी तयार करावी. शाळेमधील प्रत्येक मुलाकडे चौरस वही किंवा पाटी असते. त्यामुळे फक्त एक पाटी किंवा फळा आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या फलकाचा / पाटीचा वापर  करुन मुलांचे गणितीय संख्याज्ञान गणितीय क्रीया भौमितीक आकार इत्यादी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मुलांना ‍ गणिताची गोडी निर्माण होण्यासाठी ज्ञानरचनावादावर आधारीत तसेचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमासाठी उपयुक्त अशी पाटी तयार केलेली आहे.
पाटीचा वापर करुन मुलांना खालील घटक शिकविता येतात.
अवकाशिय संबोध :- वर-खाली, डावीकडे –उजवीकडे इत्यादी
अंकओळख :- 3 चौकोण रंगवा, 3 वस्तु ठेवा, इत्यादी.
ेरीज :- पाटीवर 3 चौकोन रंगव नंतर वेगळया रंगाने 2 चौकोन रंगव. आता किती चौकोन रंगविले ते मोजुन लिहा.
वजाबाकी:- मुलांना 7 चौरस रंगविण्यास सांगणे. त्यामधुन 3 कमी करण्यास सांगणे.
गुणाकार :- पाटीवर मुलांना आडव्या रेषेवर तीन चौरस रंगव. आता उभ्या रेषेवर 4 चौरस रंगव. एकुण किती चौरस रंगविले.
भागाकार :- 20 चे समान भाग करा. 
लहान मोठी संख्या:-ते 100 संख्या लिहुन घ्या. मुलांकडे  दोन वस्तु दयाकोणत्याही दोन अंकावर ठेवादोन अंकामधील फरक किती आहे. लहान संख्या कोणती व मोठी संख्या कोणती सांगता येते.
चढता उतरता क्रम :- खेळ तीन रींग टाका. संख्या लिहा. लहान संख्या मोठी संख्या व नंतर सर्वात मोठी संख्या चढता क्रम, याच्या उलट उतरता क्रम.
सम संख्या विषम संख्या:- 1 ते 100 संख्यामध्ये 1,3,5,7,9 ज्यांच्या एककस्थानी हे अंक येतात त्या संख्या विषम व ज्या संख्याच्या एकक स्थनी 0,2,4,6,8,हे अंक येतात त्या संख्या विषम
एकक दशक:- 10 चौकोन एका रंगाणे रंगविणे. 2एका रंगाणे 5एका रंगाणे.इ. 1दशक 7 एकक रंगविले. या प्रमाणे एकक दशक स्पष्ट करता येतात.
भौमितीक आकार :- आयत चौरस त्रिकोन या प्रमाणे आकार उभी रेषा आडवी रेषा तिरपी रेषा इ.
टप्याने येणाऱ्या संख्या:- या मध्ये 2 च्या टप्याने किंवा 5 च्या पुढे 4 च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या लिहा इ.
पुर्णांक :- पुर्ण चौरस रंगविणे, अर्धा रंगविणे.इ.
परीमिती क्षेत्रफळ:- दिलेल्या चौरसाची परीमिती मोजाणे. इ.
कोन:- सरळ रेषा ओढुन कोटकोन तयार करणे. लघुकोन विशालकोन इ.कोन तयार करणे. आकृतीबंध:- संख्याचा आकृतीबंध किंवा रंगांचा आकृतीबंध तयार करणे.
इत्यादी घटक  शिकविण्यास उपयोग होतो.
माझी चौरस पाटी हे एक कमी खर्चीक  साहीत्य आहे .या पाटीच्या साहयाने मुलांना ‍ गणिता मधिल अनेक घटक  शिकविता येताता. त्या साठी लागणारे साहीत्यही खुप कमी खर्चीक आहे.
फायदे :-
संधोब पक्के होतात.
भरपुर सराव होतो.
एकाग्रता वाढते.
ज्ञानरचनावादी दृष्टीकोन विकसित होतो.
आनंददायी पध्दतीने  शिकतात.