रविवार, १ सप्टेंबर, २०२४

मधुकर राऊत यांच्या नवोपक्रमाची निवड राष्ट्रीय स्तरावर

स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याकडून सन्मान

पुणे स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा यांच्या मार्फत घेण्यात आली. राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेत  लहानघोडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. मधुकर काशिनाथ राऊत यांच्या *शोध गणित मास्टरचा* या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असुन त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सारथी शिष्यवृती प्रमुख अशोक काकडे, प्रसिद्ध साहित्यिक संजय जगताप, सकाळचे सोलापूर जिल्ह्याचे संपादक अभय दिवाणजी, योगेश सोनावणे, बालभारतीचे सदस्य अजयकुमार लोळगे, लातूरच्या कलेक्टर वर्षा ठाकूर, सर फाउंडेशनचे संयोजक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम मशाळे, राजकिरण चव्हाण आदींच उपस्थित देण्यात आला. 

  राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयन्न करीत असतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये म्हणून नवनवीन उपक्रम व कल्पनांचा वापर करत असतात. त्यांनी राबवलेल्या उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना माहिती व्हावी तसेच सर्व स्तरातील शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्या नवोपक्रमशिलतेला  व सृजनशिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यामार्फत आयोजीत केली जाते.

            या वर्षी नवोपक्रम स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला या स्पर्धेत लहानघोडी शाळेतील नवोपक्रमशिल शिक्षक श्री. मधुकर काशिनाथ राऊत यांच्या नवोपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळाले असून शाळेतील मुख्याध्यापिका श्रीम. आरती वाघमारे, केंद्रप्रमुख - श्री सी. पी. महाले, विस्तार अधिकारी - श्री. भाऊसाहेब सरक, गटशिक्षणाधिकारी - श्रीम. अल्फा देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबदल शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.


National Education innovation Award 202