Science talent search examination 2026
पंचायत समिती सुरगाणा ता. सुरगाणा जि. नाशिक
सुरगाणा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी मा. श्रीम. अल्पा देशमुख मॅडम सो. यांच्या संकल्पनेतून सुरगाणा तालुक्यात *सायन्स टॅलेंट सर्च* हा एक स्पर्धा परीक्षा उपक्रम राबविण्यात येत आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व अवांतर वाचनाची आवड निर्माण होईल यादृष्टीने आपल्याच तालुक्यातील हुशार व तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांकडून सराव प्रश्नपत्रिका तयार करून घेण्यात येत आहेत व आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तरी आपण सर्वांना विनंती व आवाहन आहे की आपण या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांना 1 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मंच उपलब्ध करून देऊया...
सदर उपक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे
1. *इयत्ता 4 थी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांची सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा घेणे* .
2. सदरची परीक्षा मार्च च्या पाहिल्या आठवड्यात घेण्याबाबत नियोजित आहे.
3. विषय. प्रश्न संख्या
१) विज्ञान- १५
२) गणित- १५
३) सामान्यज्ञान- १०
४) इंग्लिश- १०
----------------------------------
एकूण प्रश्न - ५०
4. सराव- आठवड्यातून 3 दिवस (सोमवार, बुधवार व शुक्रवार)
5. परीक्षेचे स्वरूप- बहुपर्यायी (1 प्रश्न साठी 4 पर्याय)
6. दर 15 दिवसांनी एका विषयाची किमान 50 प्रश्नांची प्रश्नपेढी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल.
7. *विज्ञान,इंग्लिश व गणित* अभ्यासक्रम व सराव करिता क्रमिक पुस्तके वापरणे.(संपूर्ण पाठांचा/धड्यांचा समावेश)
8. *सामान्य ज्ञान* - अभ्यासक्रम परिसर अभ्यास- 1 व 2, इतिहास,भूगोल, नागरिक शास्त्र व चालू घडामोडी (जनरल नॉलेज)
*अंतिम परीक्षेत प्रत्येक वर्गातील 4 विद्यार्थी याप्रमाणे उत्कृष्ट सुपर 20 मुलांची निवड करण्यात येणार आहे..*
सराव प्रश्न संच खाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत .
इयत्ता ४ थी १ DOWNLOAD डाऊनलोड
इयत्ता ५ वी १ DOWNLOAD डाऊनलोड
इयत्ता ७ वी १ DOWNLOAD डाऊनलोड
इयत्ता ८ वी १ DOWNLOAD डाऊनलोड
इयत्ता ४ थी २ DOWNLOAD डाऊनलोड
इयत्ता ५ वी २ DOWNLOAD डाऊनलोड
इयत्ता ७ वी २ DOWNLOAD डाऊनलोड
इयत्ता ८ वी २ DOWNLOAD डाऊनलोड
*सुरगाणा सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम*केंद्रस्तर
दि. 6 मार्च 2026 केंद्रशाळेत आयोजित केलेली आहे.
वेळ - सकाळी 8.30 वाजता
तालुकास्तर -
दि. 9 मार्च रोजी
सुरगाणा शाळा नंबर 1 व 2 येथे होणार आहे.
वेळ -सकाळी 10 वाजता.
ग्रुपवर पाठवलेली प्रश्नपत्रिका/प्रश्नपेढी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. प्रश्नपत्रिकेसोबत उत्तर तालिका (Answer key) दिलेली आहे. इयत्ता 4 थी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा.
तालुकास्तरीय निवड चाचणी देखील याच पद्धतीने एकूण 50 गुणांची होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा