सोमवार, २० जानेवारी, २०२५

52 वे विज्ञान प्रदर्शन प्रथम क्रमांक

 


  हतगड ता सुरगाणा जि नाशिक येथे 52 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४ - २५ पार पडले यामध्ये जि .प. प्राथ. शाळा- लहानघोडी शाळेचा १ ली ते ५ वी गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कु मंगेश नामदेव भोये इयत्ता ४थी व चेतन दिनकर जाधव इ ४थी या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन उत्तम प्रकारे सादरीकरण केले. तसेच शिक्षक प्रतिकृती मध्ये श्री . मधुकर काशिनाथ राऊत यांने हसत खेळत गणित हे शैक्षणिक साहित्य सादरीकरण केले लहानघोडी शाळेत विविध शैक्षणिक प्रयोग घेण्यात येतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इथे चांगले लेख मार्गदर्शन केले जाते म्हणून शाळेचा प्रथम क्रमांक मिळविलेल्या बदल शाळा व्य समिती तसेच बिवळ ग्रामपंचायत सरपंच हेमलता भुसारे तसेच गावातील ग्रामस्थ पालक यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या .