ग्रीनसोल फाउंडेशनतर्फे लहानघोडी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, चप्पल व चटयांचे वाटप
लहानघोडी, ता. सुरगाणा, जि. नाशिक | दि. ३ ऑक्टोबर २०२६
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी, केंद्र माणी, ता. सुरगाणा, जि. नाशिक येथील विद्यार्थ्यांसाठी ग्रीनसोल फाउंडेशन, नवी मुंबई यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून स्कूल बॅग, चप्पल तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटयांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
लहानघोडी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शैक्षणिक प्रगती, विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांतील सहभाग आणि सर्वांगीण विकासासाठी शाळेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शाळेच्या या कार्याची दखल घेत विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्ती शाळेला वेळोवेळी मोलाचे सहकार्य करत आहेत. या सहकार्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत असून त्यांच्या शिक्षणाला मोठे प्रोत्साहन मिळत आहे.
याच सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रीनसोल फाउंडेशन, नवी मुंबई यांच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, चप्पल आणि बसण्यासाठी चटया उपलब्ध करून देण्यात आल्या. आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटया आणि चप्पल मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
साहित्य शाळेपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी जि. प. प्राथमिक शाळा पालविहीरचे मुख्याध्यापक श्री. सोमनाथ पाडवी सर यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे फाउंडेशनकडून मिळालेले साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. शाळेच्या वतीने श्री. सोमनाथ पाडवी सर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला समाजाच्या सहकार्याची जोड मिळाली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळते,” या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.
उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या स्कूल बॅग, चप्पल व चटयांबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात पुढे करणाऱ्या ग्रीनसोल फाउंडेशनचे पालक व शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेच्या विविध उपक्रमांची दखल घेऊन विविध संस्था शाळेला सातत्याने सहकार्य करत आहेत, ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. अशा सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळतात आणि शिक्षणाबद्दल त्यांच्यामध्ये अधिक उत्साह निर्माण होतो.
स्कूल बॅग, चप्पल आणि बसण्यासाठी चटया मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हेच या उपक्रमाचे खरे समाधान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आले .
“विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला समाजाच्या सहकार्याची जोड मिळाली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळते,” या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला. या कार्यक्रमासाठी चंदर गावित सर, महेंद्र पाडवी, विठ्ठल ठाकरे, शंकर कामडी, लक्ष्मण भोये, धर्मा भोये, कमल कामडी, मनीषा पवार, मंदा भोये, कुसुम पवार, नर्मदा मोरे, भारती ठाकरे, राधा कामडी, कुसुम भोये, कांता धुळे आणि सीता गायकवाड हे पालक उपस्थित होते.
उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या स्कूल बॅग, चप्पल व चटयांबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात पुढे करणाऱ्या ग्रीनसोल फाउंडेशनचे पालक व शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रताप देशमुख व श्री मधुकर राऊत यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.







