जि.प. प्रा. शाळा - लहानघोडी ता.सुरगाणा जि नाशिक शाळेमध्ये वर्षभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत आहेत. विविध उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले. या उपक्रामध्ये विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रमाणपत्र मिळविलेली आहेत. सदर उपक्रमाचे कार्यक्रमाचे विविध स्पर्धांचे फोटो काढलेले आहेत. त्या फोटोचे छोटे छोटे बॅनर तयार करून शालेय परिसरामध्ये ठराविक अंतरावर लावण्यात आले. फोटोवरती विद्यार्थ्यांनी केलेले कार्याचा उल्लेख केलेला आहे. या मुळे विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळत आहे. व इतर विद्यार्थी त्यापासून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा असे चांगले उपक्रम कार्यक्रम स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन माझा सुद्धा बॅनरवर फोटो लागावा या हेतुने तयारी करतात.
विद्यार्थ्याचे पालक सुद्धा शाळेमध्ये आल्यावर सर्व बॅनर वाचन करतात. आपल्या मुलांना सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. तसेच गावातील ग्रामस्थ अधिकारी हे सुधा आल्यावर सर्व बॅनर वाचन करीत असता. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देत आहेत.
शालेय परीसर स्वच्छ सुंदर असुन या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाड फळझाडे लावलेली आहेत. या मध्ये जागो जागी शालेय उपक्रमाचे २६ जानेवारी २०२५ रोजी 30 बॅनर लावण्यात आले. आहेत त्यामुळ शालेय परिसर आणखी चांगला वाटतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा