
दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन शाळेमध्ये आनंददाई वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढून घोषणा देऊन जनजागृती केले नंतर गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. त्यामध्ये मंगेश नामदेव भोये प्रथम क्रमांक संकेत कैलास पवार इयत्ता दुसरी दुसरा क्रमांक देवयानी अनिल कुवर तिसरा क्रमांक विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे इयत्ता दुसरीतील संकेत पवार या विद्यार्थ्याने इंग्रजी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली . त्यानंतर शाळेमधील विविध उपक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये वाचन यात्री हा उपक्रम दोन ऑक्टोबर 2024 पासून आज 26 जानेवारी 2025 पर्यंत घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त गोष्टीची पुस्तके वाचले त्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. यामध्ये मंगेश नामदेव भोये 67 पुस्तकाचे वाचन केले. त्याचा प्रथम क्रमांक आला. महेंद्र दिनकर कुवर यांनी 56 पुस्तक वाचले. याचा दुसरा क्रमांक आला. व राजेंद्र मोहरे 52 पुस्तक वाचन केले त्याचा तिसरा क्रमांक आला. आहे सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचून नोंदी केलेल्या आहेत. अशा प्रकारे आज वाचन यात्री उपक्रमाचा बक्षिस वितरण करण्यात आला. त्यानंतर शाळेमधील विविध कार्यक्रमाचे बक्षिस वितरण करण्यात आले . त्यामध्ये रंगोत्सव स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, बिरस्तरीय क्रिडा स्पर्धा, विरगाथा 4.0 , शालेय विविध स्पर्धा, नवोपक्रम, यांचे बक्षिस वितरण उपस्थितांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम सरपंच सौ हेमलता भुसारे शाळा स्थापन समिती अध्यक्ष नामदेव भोये ग्रामपंचायतीचे सदस्य गावातील ग्रामस्थ पालक शिक्षक अंगणवाडीताई सर्वजन उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा