सोमवार, १४ एप्रिल, २०२५

नवोपक्रमशिल शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे येथील शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. या शाळेमध्ये श्री मधुकर राऊत सन 2019 मध्ये सिंधुदुर्ग येथून जिल्हा बदलीने हजर झाले. शाळेमध्ये विविध उपक्रम घेऊन पटसंख्या वाढवण्यास मदत झाली. बाहेर गावचे शाळेमधून विद्यार्थी या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत . शाळा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असूनही स्पर्धा परीक्षेची तयारी होण्याच्या हेतूने शाळेमध्ये मंथन प्रज्ञाशोध परीक्षा ओलंपियाड परीक्षा मार्गदर्शन करण्यात येते . ग्रामीण भागातील विद्यार्थी बोलण्यास घाबरतात म्हणून शाळेने आपली शाळा आपली बातमी यूट्यूब चैनल वरून विद्यार्थी बातम्या तयार करून प्रसारित करीत आहेत. शाळेमध्ये घेतलेले उपक्रम rautmk.blogspot.com या शाळेच्या ब्लॉगच्या माध्यमातून इतर शाळांनाही मदत होते . विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रत्येक वर्षी विद्यार्थी व शिक्षक सहभागी होऊन चांगली कामगिरी केलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी प्रयोग छोटे किमया मोठी यासारखे नवोपक्रम शाळेमध्ये राबवले जातात. हरवले सापडले या क्रमांतर्गत विद्यार्थ्याला मिळालेला दहा हजार रुपयांचा मोबाईल परत केला .पालकांच्या सहकार्यातून शालेय परिसरामध्ये फळझाडे तसेच केळीच्या झाडाची लागवड करण्यात आली आहे शालेय पोषण आहार मध्ये केळीचा वापर करण्यात येत आहे शालेय परीसरामध्ये शोभिवंत झाडे लावून परीसर आकर्षक करण्यात आला आहे .परसबाग स्पर्धेमध्ये शाळेला पारितोषिक मिळले आहे. एकविसाव्या शतकामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहणार नाही यासाठी गावच्या सरपंच सौ हेमलता भुसारे यांनी शाळेसाठी संगणक टीव्ही सोलर उपलब्ध करून दिला आहे . याचा वापर करून विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स शिकत आहेत तसेच विद्यार्थी कोडींग करून स्वतः विविध शैक्षणिक साहित्य तयार करीत आहेत. याची दखल घेऊन हेकेथॉन स्पर्धेमध्ये शाळेची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. शाळेसाठी विविध शैक्षणिक संस्था यांच्याकडून वह्या स्कूल बॅग छत्री पाटी पेन्सिल स्वेटर तसेच अनेक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत .गावातील ग्रामस्थांकडून शाळेसाठी पाण्याची टाकी स्वयंपाक भांडी सेट खुर्च्या इत्यादी साहित्य देण्यात आलेले आहेत .

शाळेमध्ये कागदाच्या लगद्यापासून आदिवासी वस्तू तयार करण्यात आल्या आहेत .

 शोध गणित मास्टरचा या नवोपक्रमाची निवड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकने निवड झाली असून शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात येतात यामध्ये वाचन यात्री पाढे पाठांतर करूया खूप स्टार मिळवूया सेल्फी विथ बॅनर बँक ऑफ लहानघोडी प्रयोग छोटे किमया मोठी आमची शाळा आमची दिनदर्शिका आनंददाई शनिवार किचन गार्डन सीड बँक एक बी उद्यासाठी ज्ञानी मी होणार टाकावतून टिकाऊ शालेय रोपवाटीका यासारखे शाळेमध्ये खूप उपक्रम घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावदेण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेतअध्यक्ष चषक स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षीस प्राप्त झाले आहेत .

 विनोबा ॲप वरती शाळेतील उपक्रमांचे शैक्षणिक व्हिडीओ अपलोड केले असून याचा उपयोग इतर शाळांनाही होतो .


गुणवत्तापूर्ण पारितोषिके 


राजस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये जिल्हा स्तर प्रथम क्रमांक

सिंधुताई सकपाळयांच्या हस्ते शिक्षण रत्न पुरस्कार

राज्य स्तराय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तिसरी चौथी गटांमध्ये तालुकास्तरीय प्रथम क्रमांक

शालेय परसबाग निर्मितीमध्ये तिसरा क्रमांक

विनोबा पोस्ट ऑफ मन पुरस्कार

हॅकेथॉन स्पर्धा जिल्हा स्तरावर सहभाग

 रंगोत्सव चित्रकला स्पर्धा सहभाग


माझी चौरस पाटी पुस्तक लेखन केले आहे .

शालेय उपक्रमासाठी व शालेय कामासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आरती वाघमारे या नेहमी अग्रेसर आहेत .

 गटशिक्षणाधिकारी अल्फा देशमुख विस्तार अधिकारी नरेंद्र कचवे केंद्रप्रमुख चिंतामण महाले मुख्याध्यापिका आरती वाघमारे शिक्षक मधुकर राऊत शाळा व्य स अध्यक्ष नामदेव भोये यांच्या प्रयत्नाला गौरविले आहे .
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा