बुधवार, ५ मार्च, २०२५

मोहपाडा शाळेला भेट


 दि.4/2/2025 रोजी मोहपाडा आश्रम शाळेला भेट दिली. शालेय परीसर मोठा असून सभोवताली वृक्षरोपण केलेले आहे  व शोभेचे झाडे लावले असून परीसर सुंदर व शुशोभित आहे.
शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हा परिपाठ संपवून सर्व विद्यार्थी वर्गामध्ये बसले होते . इयत्ता ५वी च्या वर्गामध्ये भेट दिली . सर्व विद्यार्थ्यानी टाळ्या वाजवून स्वागत केले . वाजेसर हे हजेरी घेत होते  मी खुर्चिवर बसुन निरीक्षण करीत होतो . हजेरी घेताना विद्यार्थी yes sir ऐवजी इंग्रजी मधुन वाक्य सांगत होती. हा त्यांच्या शाळेतील एक इंग्रजी उपक्रम होता. ग्रामिण भागतील विद्यार्थी इंग्रजी बोलते व्हावे हाच एक उद्देश असावा. नंतर सरांनी माझा परीचय करून दिला. विद्यार्थी सहज न घाबरता संवाद साधत होती. शाळेतील विविध उपक्रमाची माहिती घेतली . विद्यार्थ्यांनी तयार केलेले साबन मी पाहिले . अलेक्सा बद्दल माहिती सांगितली. तसेच शाळेने दरवर्षी  विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थी प्रतिकृती शिक्षक प्रतिकृती यांच्यामध्ये वेगवेगळे पारितोषिक प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी खूप चांगले कार्य चालू आहे. वर्गामध्ये भेट दिली असतात विद्यार्थ्यांनी स्वागत केले वर्ग सुशोभीकरण केलेले असून सर्व भिंती रंगरंगोटी करण्यात आलेली आहे सर्व वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. शाळेमध्ये चालु असलेले विविध उपक्रम आनंददाई शनिवार,
पुस्तकापलिकडेल जिवन शिक्षण, राष्ट्रीय विज्ञान दिन , शिष्यवृती परिक्षा, वर्ग अध्यापनामध्ये ICT टुल चा वापर, म्युझीयम आपल्या दारी , मतदार जनजागृती उपक्रम, शालेय परसबाग निर्मिती, बालसभा, बाल आनंद मेळावा, नवोपक्रम स्पर्धा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हा स्तरावर ब गटामध्ये प्रथम क्रमांक असे विविध नाविण्यापूर्ण उपक्रम राबवून  विविध पुरस्कार पारितोषिक प्राप्त झाले आहेत 
    एकंदर शालेय परिसर शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व इतर सर्व कर्मचारी हे शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेऊन विद्यार्थी पुढे जाण्यासाठी धडपडत करीत आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा