सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

विनोबा टिमकडून लहानघोडी शाळेचा सत्कार .

Vinoba टीम याचे कडून तालुकास्तरीय पोस्ट आँफ मंथ जि.प.शाळा लहानघोडी ता. सुरगाणा जि. नाशिक शाळेस देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी मा.अल्फा देशमुख मॅॅॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र व साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास  केंद्रप्रमुख विस्तारअधिकारी, संघटनेचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नाशिक येथून विनोबा टिमचे श्री.राकेश महाजन सर उपस्थित होते. श्री महाजन सर यांनी शाळेस भेट देऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विनोबा टिम मार्फत शैक्षणिक साहित्य देण्यात. विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून मार्गदर्श केले. शाळेच्या वतीने विनोबा टिमचे आभार मानले.




















शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

*जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनचा प्रामाणिकपणा दहा हजार रुपयाचा मोबाईल केला परत


*जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनचा प्रामाणिकपणा दहा हजार रुपयाचा मोबाईल केला परत*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - लहानघोडी ता.सुरगाणा जि. नाशिक शाळेतील विद्यार्थी तन्मय वाघमारे इयत्ता ३री व हर्षवर्धन वार्डे इयत्ता २री यांचे घर शाळेपासून दिड किलोमिटर अंतरावर आहे. ४/१२/२०२४ रोजी संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी जाताना रस्त्यावर मोबाईल दिसला. जवळ कोणीही नाही. म्हणून उचलून घेतला व शाळेमध्ये जमा केला. लहानघोडी शाळेमध्ये मधुकर राऊत व आरती वाघमारे हे शिक्षक वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतात . त्यामध्ये *हरवले सापडले* हा उपक्रम दोन वर्षापासून सुरू आहे. या उपक्रमा अंतर्गत कोणाची वस्तू हरवली किंवा सापडली तर परत देण्यात येते. त्यानुसार त्यांनी मोबाईल शाळेमध्ये जमा केला. मोबाईल स्विच ऑफ होता. त्यामुळे कोणाचा मोबाईल आहे हे माहित नाही. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व गावातील ग्रामस्थांना बोलावून सांगीतले. कोणाचा मोबाइल आहे ओळख पटवून शाळेतून घेऊन जाणे असे सांगण्यात आले. गावातील कोणाच्याही मोबाईल नाही. दुसऱ्या दिवशी मोबाईल चार्जींग करून फोन केला असता. हा मोबाईल मोठीघोडी ता.सुरगाणा जि नाशिक येथील श्री. सुरेश वाघमारे यांचा आहे असे समजले. त्यांना शाळेत बोलावून मोबाईल परत देण्यात आला. धावपळीच्या जिवनात कोणाची वस्तू सापडली तर कोणीही परत देत नाही. परंतुशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा पाहुन कौतूक केले तितके कमी आहे . बालवयामध्ये मुलांनचा प्रमाणिकपणा पाहून इतर विद्यार्थ्यांनी प्रमाणिकपणे रहायला पाहिजे. याचे जिवंत उदाहरण मुलांनी अनुभवले. सदर विद्यार्थांचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .



बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

रंगोत्सव सेलेब्रेशन स्पर्धेमध्ये लहानघोडी शाळेतील यशस्वी विद्यार्थी


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी ता सुरगाणा जिल्हा नाशिक येथे *रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा *आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा ही रंगोत्सव मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आली . या स्पर्धेत विविध स्पर्धाचा समावेश करण्यात आला होता . त्यामध्ये चित्रकला ,कोलाज , रंगभरण , स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या मध्ये 

*गोल्ड मेडल ६ अवॉर्ड*

*सिल्वर मेडल ४ अवॉर्ड*

*ब्रांझ मेडल 3 अवॉर्ड*

 प्राप्त झालेले आहेत.सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. तसेच *१३ विद्यार्थ्यांची निवड इंटरनॅशनल लेव्हल वर झालेली आहे.* सदर स्पर्धेत शाळेतील शिक्षकांनी Art Teacher colouring या स्पर्धेत सहभाग घेतला होता. श्रीम. आरती मनोहर वाघमारे यांना प्रमाणपत्र तर  श्री . मधुकर काशिनाथ राऊत प्रमाणपत्र व गिफ्ट देण्यात आले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मा. श्री. सी. पी. महाले साहेब केंद्रप्रमुख - माणी ता . सुरगाणा जि नाशिक यांनी केले .












मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती जयंती

२ ऑक्टोबर २०२४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी ता. सुरगाणा जिल्हा नाशिक येथे महात्मा गांधी जंयती व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. महात्मा गांधी जंयती व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

 २ ऑक्टोबर  महात्मा गांधी जंयती व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी ता. सुरगाणा जि नाशिक शाळेचे माजी विद्यार्थी श्री. पोपट वाघमारे सध्या म.वि.प्र. समाज नाशिक जनता विद्यालय जायखेडा ता सटाणा जिल्हा नाशिक येथे माध्यमिक शिक्षक.  म्हणून कार्यरत आहेत त्यांनी शाळा व गाव सुशोभिकरण करण्यासाठी १००० अशोक झाडाची रोपे देण्यात आली . सदर झाडांचे वृक्षारोपण शालेय परिसर तसेच गावामध्ये करण्यात आले.

स्वच्छता हि सेवा उपक्रम अंतर्गत शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेची माहिती व महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले .











रविवार, १ सप्टेंबर, २०२४

मधुकर राऊत यांच्या नवोपक्रमाची निवड राष्ट्रीय स्तरावर

स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याकडून सन्मान

पुणे स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा यांच्या मार्फत घेण्यात आली. राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेत  लहानघोडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. मधुकर काशिनाथ राऊत यांच्या *शोध गणित मास्टरचा* या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असुन त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सारथी शिष्यवृती प्रमुख अशोक काकडे, प्रसिद्ध साहित्यिक संजय जगताप, सकाळचे सोलापूर जिल्ह्याचे संपादक अभय दिवाणजी, योगेश सोनावणे, बालभारतीचे सदस्य अजयकुमार लोळगे, लातूरच्या कलेक्टर वर्षा ठाकूर, सर फाउंडेशनचे संयोजक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम मशाळे, राजकिरण चव्हाण आदींच उपस्थित देण्यात आला. 

  राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयन्न करीत असतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये म्हणून नवनवीन उपक्रम व कल्पनांचा वापर करत असतात. त्यांनी राबवलेल्या उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना माहिती व्हावी तसेच सर्व स्तरातील शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्या नवोपक्रमशिलतेला  व सृजनशिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यामार्फत आयोजीत केली जाते.

            या वर्षी नवोपक्रम स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला या स्पर्धेत लहानघोडी शाळेतील नवोपक्रमशिल शिक्षक श्री. मधुकर काशिनाथ राऊत यांच्या नवोपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळाले असून शाळेतील मुख्याध्यापिका श्रीम. आरती वाघमारे, केंद्रप्रमुख - श्री सी. पी. महाले, विस्तार अधिकारी - श्री. भाऊसाहेब सरक, गटशिक्षणाधिकारी - श्रीम. अल्फा देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबदल शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.


National Education innovation Award 202