*कॉम्प्यूटर सायन्स हॉकेथॉन स्पर्धा*
जिल्हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरगाणा तालुकास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॉकेथॉन स्पर्धा 2024-25 चे आयोजन करण्यात आले होते .
Computer science hackethon ही स्पर्धा इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सहयोगी संगणक विज्ञान आणि कोडींगवर आधारीत स्पर्धा होती .
सदर स्पर्धा ही शासकीय आश्रम शाळा माणी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती.
*गटशिक्षणाधिकारी मा.अल्फा देशमुख मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री. नाईकवाडे साहेब* तसेच तालुक्यातील विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते. 21 व्या शतकातील विविध कौशल्ये आणि कोडींग बद्दल ज्ञान अवगत करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी* तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन *प्रथम क्रमांक* मिळवला. मंगेश नामदेव, भोये चेतन दिनकर जाधव, रितेश शांताराम मोरे, तन्मय देविदास वाघमारे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.