बुधवार, २६ मार्च, २०२५

Computer science Hekethon


*कॉम्प्यूटर सायन्स हॉकेथॉन स्पर्धा*

जिल्हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरगाणा तालुकास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॉकेथॉन  स्पर्धा 2024-25 चे आयोजन करण्यात आले होते .

 Computer science  hackethon ही  स्पर्धा इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सहयोगी संगणक विज्ञान आणि कोडींगवर आधारीत स्पर्धा होती .

सदर स्पर्धा ही शासकीय आश्रम शाळा माणी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. 

*गटशिक्षणाधिकारी मा.अल्फा देशमुख मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री. नाईकवाडे साहेब* तसेच तालुक्यातील विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते. 21 व्या शतकातील विविध कौशल्ये आणि कोडींग बद्दल ज्ञान अवगत करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी* तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन *प्रथम क्रमांक* मिळवला. मंगेश नामदेव, भोये चेतन दिनकर जाधव, रितेश शांताराम मोरे, तन्मय देविदास वाघमारे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.







मंगळवार, १८ मार्च, २०२५

पर्यावरण पुरक रंग तयार करणे

पर्यावरण पुरक रंग तयार करणे.

जि.प. प्रा. शाळा - लहानघोडी ता.सुरगाणा जि नाशिक शाळेमध्ये वर्षभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत आहेत. त्या मध्ये रंगपंचमी सणानिमित्त पर्यावरण पुरक रंग तयार करणे. हा उपक्रम शाळेमध्ये घेण्यात आला. r रासायनिक रंग व पर्यावरण पुरक रंग या बदल विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले. 

 यु टुुब व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा .

https://youtu.be/mhKQ6szvUf8?feature=shared

घरगुती पद्धतीने रंग तयार करण्यासाठी कोणते साहित्य पाहिजे याची यादी करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती करू घेण्यात आली. रंग तयार करण्यासाठी पान फुले हळद फळे मक्याचे पिठ या साहित्याचा वापर करून शाळेमध्ये रंग तयार करून घेण्यात आले. नंतर या रंगाचा वापार करून विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये पर्यावरण पुरक रंगपंचमी साजरी केली.




रासायनिक रंग आणि पर्यावरणपूरक रंग यांच्यातील फरक खालीलप्रमाणे:
रासायनिक रंग
 * उत्पादन: हे रंग रासायनिक पदार्थांपासून बनवले जातात, ज्यात जड धातू आणि विषारी रसायनांचा समावेश असतो.
 * पर्यावरणावर परिणाम: रासायनिक रंग माती आणि पाण्यात मिसळल्यास प्रदूषण वाढते. हे रंग जलचर प्राण्यांसाठी आणि मानवासाठी हानिकारक असतात.
 * आरोग्यावर परिणाम: रासायनिक रंगांमुळे त्वचेची ऍलर्जी, डोळ्यांना जळजळ आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात.
 * निसर्गावर परिणाम: रासायनिक रंगामुळे निसर्गातील प्राणी आणि वनस्पती यांच्यावर विपरित परिणाम होतो.
 * उपयोग: रासायनिक रंग हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे, अनेकजण होळीच्या सणादरम्यान याचा वापर करतात.
पर्यावरणपूरक रंग:
 * उत्पादन: हे रंग नैसर्गिक स्रोतांपासून बनवले जातात, ज्यात फुले, फळे, भाज्या आणि वनस्पतींचा समावेश असतो.
 * पर्यावरणावर परिणाम: पर्यावरणपूरक रंग माती आणि पाण्यात मिसळल्यास कोणतेही प्रदूषण होत नाही. हे रंग जलचर प्राण्यांसाठी आणि मानवासाठी सुरक्षित असतात.
 * आरोग्यावर परिणाम: पर्यावरणपूरक रंगांमुळे त्वचेची ऍलर्जी किंवा इतर कोणतेही आजार होण्याची शक्यता कमी असते.
 * निसर्गावर परिणाम: पर्यावरणपूरक रंगामुळे निसर्गातील प्राणी आणि वनस्पती यांच्यावर कोणताही विपरित परिणाम होत नाही.
 * उपयोग: पर्यावरणपूरक रंग हे रासायनिक रंगांपेक्षा थोडे महाग असतात, परंतु ते आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित असतात.
पर्यावरणपूरक रंग वापरण्याचे फायदे:
 * पर्यावरणपूरक रंगांमुळे पर्यावरणाचे संरक्षण होते.
 * हे रंग आरोग्यासाठी सुरक्षित असतात.
 * नैसर्गिक रंग त्वचेला आणि केसांना हानी पोहोचवत नाहीत.
 * नैसर्गिक रंगांमध्ये विविध रंग उपलब्ध असतात.
पर्यावरणपूरक रंग वापरण्याचे तोटे:
 * रासायनिक रंगांच्या तुलनेत पर्यावरणपूरक रंग थोडे महाग असतात.
 * ते रासायनिक रंगांपेक्षा लवकर फिकट होतात.
 * पर्यावरणपूरक रंग सर्वत्र उपलब्ध नसतात.
पर्यावरणपूरक रंग तयार करण्याच्या पद्धती:
 * पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांचा वापर करून हिरवा रंग तयार करता येतो.
 * बीट, डाळिंब यांसारख्या फळांचा वापर करून लाल रंग तयार करता येतो.
 * हळद, झेंडूची फुले यांसारख्या वनस्पतींचा वापर करून पिवळा रंग तयार करता येतो.
पर्यावरणपूरक रंग वापरण्याचे आवाहन:
 * होळीच्या सणादरम्यान रासायनिक रंगांचा वापर टाळा.
 * पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून सुरक्षित होळी साजरी करा.
 * पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक रंग वापरा.


बुधवार, ५ मार्च, २०२५

मोहपाडा शाळेला भेट


 दि.4/2/2025 रोजी मोहपाडा आश्रम शाळेला भेट दिली. शालेय परीसर मोठा असून सभोवताली वृक्षरोपण केलेले आहे  व शोभेचे झाडे लावले असून परीसर सुंदर व शुशोभित आहे.
शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हा परिपाठ संपवून सर्व विद्यार्थी वर्गामध्ये बसले होते . इयत्ता ५वी च्या वर्गामध्ये भेट दिली . सर्व विद्यार्थ्यानी टाळ्या वाजवून स्वागत केले . वाजेसर हे हजेरी घेत होते  मी खुर्चिवर बसुन निरीक्षण करीत होतो . हजेरी घेताना विद्यार्थी yes sir ऐवजी इंग्रजी मधुन वाक्य सांगत होती. हा त्यांच्या शाळेतील एक इंग्रजी उपक्रम होता. ग्रामिण भागतील विद्यार्थी इंग्रजी बोलते व्हावे हाच एक उद्देश असावा. नंतर सरांनी माझा परीचय करून दिला. विद्यार्थी सहज न घाबरता संवाद साधत होती. शाळेतील विविध उपक्रमाची माहिती घेतली . विद्यार्थ्यांनी तयार केलेले साबन मी पाहिले . अलेक्सा बद्दल माहिती सांगितली. तसेच शाळेने दरवर्षी  विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थी प्रतिकृती शिक्षक प्रतिकृती यांच्यामध्ये वेगवेगळे पारितोषिक प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी खूप चांगले कार्य चालू आहे. वर्गामध्ये भेट दिली असतात विद्यार्थ्यांनी स्वागत केले वर्ग सुशोभीकरण केलेले असून सर्व भिंती रंगरंगोटी करण्यात आलेली आहे सर्व वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. शाळेमध्ये चालु असलेले विविध उपक्रम आनंददाई शनिवार,
पुस्तकापलिकडेल जिवन शिक्षण, राष्ट्रीय विज्ञान दिन , शिष्यवृती परिक्षा, वर्ग अध्यापनामध्ये ICT टुल चा वापर, म्युझीयम आपल्या दारी , मतदार जनजागृती उपक्रम, शालेय परसबाग निर्मिती, बालसभा, बाल आनंद मेळावा, नवोपक्रम स्पर्धा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हा स्तरावर ब गटामध्ये प्रथम क्रमांक असे विविध नाविण्यापूर्ण उपक्रम राबवून  विविध पुरस्कार पारितोषिक प्राप्त झाले आहेत 
    एकंदर शालेय परिसर शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व इतर सर्व कर्मचारी हे शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेऊन विद्यार्थी पुढे जाण्यासाठी धडपडत करीत आहेत.