Vinoba टीम याचे कडून तालुकास्तरीय पोस्ट आँफ मंथ जि.प.शाळा लहानघोडी ता. सुरगाणा जि. नाशिक शाळेस देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी मा.अल्फा देशमुख मॅॅॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र व साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास केंद्रप्रमुख विस्तारअधिकारी, संघटनेचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नाशिक येथून विनोबा टिमचे श्री.राकेश महाजन सर उपस्थित होते. श्री महाजन सर यांनी शाळेस भेट देऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विनोबा टिम मार्फत शैक्षणिक साहित्य देण्यात. विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून मार्गदर्श केले. शाळेच्या वतीने विनोबा टिमचे आभार मानले.
पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- नाशिक जिल्हा परिषद
- माझ्या आयी किटवाडी शाळेतील विदयार्थी
- शालेय अभिलेखे
- मोर पिसांची कलाकृती
- कला कार्यानुभव कलाकृती
- शालेय उपक्रम फोटो
- आठवणीतील क्षण आयी-केंद्र
- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
- सहयाद्री शिक्षणरत्न पुरस्कार 2019-20
- वर्तमान पत्र बातम्या
- श्री मधुकर राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
- परसबाग
- गणित मास्टर नवोपक्रम
सोमवार, १६ डिसेंबर, २०२४
शनिवार, ७ डिसेंबर, २०२४
*जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनचा प्रामाणिकपणा दहा हजार रुपयाचा मोबाईल केला परत
*जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनचा प्रामाणिकपणा दहा हजार रुपयाचा मोबाईल केला परत*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - लहानघोडी ता.सुरगाणा जि. नाशिक शाळेतील विद्यार्थी तन्मय वाघमारे इयत्ता ३री व हर्षवर्धन वार्डे इयत्ता २री यांचे घर शाळेपासून दिड किलोमिटर अंतरावर आहे. ४/१२/२०२४ रोजी संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी जाताना रस्त्यावर मोबाईल दिसला. जवळ कोणीही नाही. म्हणून उचलून घेतला व शाळेमध्ये जमा केला. लहानघोडी शाळेमध्ये मधुकर राऊत व आरती वाघमारे हे शिक्षक वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतात . त्यामध्ये *हरवले सापडले* हा उपक्रम दोन वर्षापासून सुरू आहे. या उपक्रमा अंतर्गत कोणाची वस्तू हरवली किंवा सापडली तर परत देण्यात येते. त्यानुसार त्यांनी मोबाईल शाळेमध्ये जमा केला. मोबाईल स्विच ऑफ होता. त्यामुळे कोणाचा मोबाईल आहे हे माहित नाही. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व गावातील ग्रामस्थांना बोलावून सांगीतले. कोणाचा मोबाइल आहे ओळख पटवून शाळेतून घेऊन जाणे असे सांगण्यात आले. गावातील कोणाच्याही मोबाईल नाही. दुसऱ्या दिवशी मोबाईल चार्जींग करून फोन केला असता. हा मोबाईल मोठीघोडी ता.सुरगाणा जि नाशिक येथील श्री. सुरेश वाघमारे यांचा आहे असे समजले. त्यांना शाळेत बोलावून मोबाईल परत देण्यात आला. धावपळीच्या जिवनात कोणाची वस्तू सापडली तर कोणीही परत देत नाही. परंतुशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा पाहुन कौतूक केले तितके कमी आहे . बालवयामध्ये मुलांनचा प्रमाणिकपणा पाहून इतर विद्यार्थ्यांनी प्रमाणिकपणे रहायला पाहिजे. याचे जिवंत उदाहरण मुलांनी अनुभवले. सदर विद्यार्थांचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .